देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे. मात्र या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी या पॅकेजची घोषणा केली आहे.
*महत्त्वाच्या घोषणा*:
▪ वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना 50 लाख रुपयांचा विमा देणार.
▪ देशातील 63 लाख स्वयं सहायता समुहांना प्रत्येकी 20 लाख रुपये मिळणार.
▪ ज्यांचे 15 हजारांपेक्षा कमी वेतन आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या पीएफमधील सर्व भाग सरकार भरणार.
▪ गरीब वृद्ध, गरीब दिव्यांग आणि गरीब विधवांसाठी अतिरिक्त 1 हजार रुपये मिळणार.
▪ येणारे 3 महिने तांदूळ, गव्हाचे तसेच डाळींंचेही गरिबांसाठी मोफत वाटप करणार.
▪ उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना तीन महिने मोफत गॅस मिळणार.
▪ देशभरातील 80 कोटी गरीब जनतेला मनरेगा अंतर्गत 5 कोटी कुटुंबांना सरकार मदत करणार.
▪ मनरेगाअंतर्गत मजुरांना दररोज 200 रुपये देणार.
▪ एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार.
▪ जनधनअंतर्गत महिलांच्या खात्यात 500 रुपये टाकण्याचा निर्णय.
▪ किसान सन्मान योजनेतील पहिला हफ्ता तत्काळ देणार.
0 comments:
Post a Comment
Please add comment