छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. या मालिकेचे शेवटचे काही भाग दाखविण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केली होती. ही विनंती डॉ. अमोल कोल्हे यांनी स्विकारली अशी चर्चा होती. मात्र ही केवळ अफवा असल्याची माहिती स्वत: अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
“गेली दोन वर्षे मालिका सुरू आहे. जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे. परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल!” अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
मालिकेत संभाजी महाराजांना औरंगाजेबानं कैद केल्याचं दाखवण्यात आलंय. त्यामुळे आता यानंतरची दृश्यं पाहाणं मनाला पटणारी नाहीत त्यामुळे ती दृश्य वगळण्याची विनंती त्यांनी केली होती.
0 comments:
Post a Comment
Please add comment