मुलींनी काय करावे किंवा काय करू नये, हे ठरवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असायला हवा :खासदार सुप्रिया सुळे

'मलींनी काय करावे किंवा काय करू नये, हे ठरवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असायला हवा :खासदार सुप्रिया सुळे 

अमरावती येथीळ एका महाविद्यालयांत गुरुवारी (१३ फेब्रुवारी) मुलींना 'मी प्रेमविवाह करणार नाही,' अशी देण्यात आली. यावरून सुळे यांनी आपले मत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या लावणी नृत्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये खुल्या गटात शर्लिन चित्रकार हिने, तर युवा गटात भैरवी मिस्त्री या तरुणीने प्रथम क्रमांक मिळवला. सुळे यांच्या हस्ते स्पर्धकांना गौरविण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुहासिनी देशपांडे, गुलाबबाई संगमनेरकर, जयमाला इनामदार, अप्सरा जळगावकर, बरखा जळगावकर, छाया खुटेगावकर, 'राष्ट्रवादी' महिला आघाडीच्या रुपाली चाकणकर आदी या वेळी उपस्थित होते.'मुलींनी काय करावे किंवा काय करू नये, हे ठरवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असायला हवा. मुलींनी प्रेम करावे अथवा करू नये हे समाजाने का ठरवावे. अशाने मुलींच्या भावभावनांचे काय होणार,' असा प्रश्न उपस्थित करून 'मुलींना कोणत्याही चुकीच्या शपथा देण्यापेक्षा त्यांना सक्षम करण्यावर भर द्यायला हवा,' असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

युवा गट आणि खुला गट अशा दोन विभागांत ही स्पर्धा झाली. दोन्ही गटांतील प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धकांना सोन्याची नथ, पैठणी आणि रोख २५ हजार रुपये असे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेसाठी नांदेड, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, नगर, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे, उस्मानाबाद, लातूर, पंढरपूर, अकोला, अमरावती येथून सुमारे दीडशे स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत मुलींबरोबर तृतीयपंथीयांनादेखील स्पर्धक होण्याचा मान देण्यात आला.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment