भुईमुग लागवड

भुईमुग लागवड 


जमीन :
मध्यम ते हलकी भुसभुशीत, सेंद्रीय पदार्थ आणि कॅल्शीयमचे भरपूर प्रमाण असलेली जमीन योग्य.

पूर्व मशागत :
बळीराम देशी नांगराची १-२ नांगरटी त्यानंतर वखराच्या २-३ पाळ्या, शेवटच्या वखर पाळीपूर्वी हेक्टरी १० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत / कंपोस्ट पसरवून जमीन भुसभुशीत करावी. मध्यम जमिनीत रुंद वरंबा व सरी पद्धत फायद्याची.

पेरणीची वेळ :
पूर्व हंगामी : मे च्या शेवटच्या आठवड्यात,
खरीप : १५ जून ते ७ जुलै,
रब्बी : १५ ते ३० सप्टेंबर,
उन्हाळी : जानेवारी ते फेब्रुवारी पहिला आठवडा.

लागणारे बियाणे (कि./हे.) :
१००-१२० किलो (उपट्या) ८० किलो (पसऱ्या) जाती. रायझोबियम व पीएसबी ची बीजप्रक्रिया करावी.

पेरणीचे अंतर (सेंमी.) :
३०×१० सेमी (उपट्या) ४५×१५ सेमी (पसऱ्या)

रासायनिक खते (कि./हे.) (नत्र:स्फुरद:पालाश) :
२५:५०:०० संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी पेरुन द्यावी.

आंतर मशागत :
दोन कोळपण्या आणि एक खुरपणी

पीक पद्धती व विशेष माहिती :
पूर्व हंगामी भुईमुगानंतर रब्बी ज्वारी, सुर्यफूल किंवा गव्हाचे पीक घ्यावे. खरीप भुईमुगास आऱ्या लागतानां आणि शेंगा भरते वेळी ओलावा नसल्यास संरक्षित पाणी द्यावे. रबी हंगामासाठी टीएजी-२४, टीजी-२६, आयसीजीएस-११ किंवा ४४ या वाणांची निवड करावी.

कीड व्यवस्थापन :
1)  मावा, फुलकिडेतुडतुडे :
  • अंडाकृती आकाराचा असून काळा व तपकिरी असतो. मावा पानातून व कोवळया शेंडयातून रस शोषून घेतात. पिकाची वाढ खंुटते. शिवाय मधासारखा द्रव झाडावर टाकतात. त्यावर काळी बुरशी तयार होते. ही कीड विषाणूजन्य रोग पसरविते. फुलकिडे तपकिरी रंगाचे व तुडतुडे पोपटी रंगाचे पाचरीच्या आकाराचे असून पानातील रस शोषण करतात.
  व्यवस्थापन:
  • डायमिथोएट ३० ईसी ५०० मिलि किंवा मिथील डिमेटॉन २५ ईसी ४०० मिलि किंवा फॉर्मोथिऑन २५ ईसी प्रवाही ६०० मिलि किंवा थायोमेटॉन २५ ईसी ४०० मिलि किंवा थायामिथॉक्झाम २५ डब्ल्युजी २०० ग्रॅम किंवा असिटामीप्रिड २० एसपी १०० ग्रॅम प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा
  • मॅलाथिऑन ५ टक्के किंवा फोसेलॉन ४ टक्के भुकटी २० कि.ग्रॅ. प्रति हेक्टर धुरळावी.
  • गरज पडल्यास दुसरी फवारणी / धुरळणी पहिली फवारणी / धुरळणी झाल्यानंतर १५ दिवसांनी करावी.

2)  पाने गुंडाळणारी अळी :
  • कीड राखट रंगाची असून तिच्यावर फिक्कट रंगाचे ठिपके असतात. अळी तांबडी असून मागील टोकाला निमुळती असते. रंग तपकिरी अगर हिरवा असतो. अळी पाने गुंडाळतात त्यामुळे झाड वाळते.
  व्यवस्थापन :
  • सायपरमेथ्रीन २५ ईसी २०० मिलि किंवा फेनव्हलरेट २० ईसी २५० मिलि किंवा डेकामेथ्रीन २.८ ईसी ५०० मिलि किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यूएससी ७०० मिलि किंवा क्विनालफॉस २५ ईसी १००० मिलि ५०० लि. प्रती हेक्टरी पाण्यात मिसळून फवारावे. किंवा
  • क्विनालफॉस १.५ भुकटी किंवा फोसॅलोन ४ टक्के भुकटी किंवा मॅलाथिऑन ५ टक्के भुकटी २० कि. ग्रॅ. प्रति हेक्टरी धुरळावी.

3)  पाने खाणारी अळी
  व्यवस्थापन :
  • ४५ एससी १५० मिलि किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ डब्ल्युएसजी १०० ग्रॅम किंवा रायनॅक्झीपार २० एससी १०० मिलि किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी १००० मिलि प्रति हेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रोग नियंत्रण :
रोग : बी कुजणे किंवा इ. रोग
प्रति किलो ग्रॅम बियाणास लागणारे औषध / प्रमाण : ५ ग्रॅम्‍ थायरम किंवा २.५ ग्रॅ. बावीस्टीन किंवा २.५ ग्रॅ. (व्हिटाव्हॉक्स) किंवा कॅप्टॉन २.५५ ग्रॅ

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment