![]() |
नोकरी नाही म्हणून बापाने पोटच्या पोरांचाच केला खून, नंतर केली आत्महत्या |
देशाची राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कंपनी बंद पडल्याने अडचणीत सापडलेल्या 44 वर्षीय व्यक्तीने रविवारी हैदरपूर बडली मोर स्टेशनवर मेट्रोसमोर उडी मारून आत्महत्या केली. या व्यक्तीजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.घटनास्थळावर कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. मधूर मलानी असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मलानी आर्थिक संकटात सापडले होते आणि सहा महिन्यांपूर्वी सॅंड-पेपर उत्पादन कारखाना बंद झाल्यानंतर ते तणानात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की, मलानींचे आई-वडील त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत करीत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुर आपली पत्नी रुपाली, मुलगी समिक्षा (14) आणि सहा वर्षांचा मुलगा श्रेयांश यांच्यासह दिल्लीच्या शालीमार बाग भागात राहत होता. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली घरी नसताना मलानींनी गळा आवळून मुलांची हत्या केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितली की, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मुलांच्या मृत्यूचे वास्तविक कारण स्पष्ट होईल." मुला-मुलीची हत्या केल्यानंतर मलानी यांनी हैदरपूर बडली मोर मेट्रो स्थानकात मेट्रोसमोर येऊन आत्महत्या केली. दोन्ही मुलांना ठार मारल्यानंतर मलानी हैदरपूर बडली मोर मेट्रो स्थानकात पोहोचले आणि मेट्रोसमोर उडी मारली. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
0 comments:
Post a Comment
Please add comment