शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील चित्रपट

छत्रपती शिवजी महाराज यांच्या शोर्यगाथेवर अनेक चित्रपट मालिका आल्या आहेत. आज शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यानिमित्त त्यांच्यावर आलेले चित्रपटांची यादी आम्ही देत आहोत.प्रभो शिवाजी- राजा शिवाजी महाराजांवर आलेला पहिला अॅनिमेटेड चित्रपट प्रभो शिवाजी राजा आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता.

शतकर्ता शिवाजी (Shatakarta Shivaji)- १९३४ मध्ये आलेल्या या चित्रपटातून शिवजी महाराजांची शोर्यगाथा आणि पराक्रम दाखवण्यात आला आहे.

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय - अन्यायाशी लढण्यासाठी एका मध्यमवर्गीय माणसाला शिवजी महाराजांचे विचार कसे मदत करू शकतात. हे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटातून दाखवण्यात आलं. २००९ मध्ये हा चित्रपट तिकिटबारीवर आला होता.

शेर शिवाजी - १९८७ मध्ये शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर शेर शिवजी हा चित्रपट आला होता. Parikshat Sahni, स्मिता पाटील, श्रीराम लागू, रमेश देव, जयश्री गडकर, अमरिश पुरी आणि असरानी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या.

स्वराज्य सीमेवर- शिवजी महारांजाच्या शोर्याची गाथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. १९३७ मध्ये हा चित्रपट तिकिटबारीवर आला होता.

छत्रपती शिवजी- रितेश देशमुखने २०१६ मध्ये छत्रपती शिवजी महाराज या चित्रपटाची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटातील सर्वात महागडा चित्रपट असल्याचं बोललं जातेय. सध्या या चित्रपटावर काम सुरू आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सर्जा - १९८७ मध्ये सर्जा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एका तरूणाची गोष्ट यामध्ये दाखवण्यात आली होती. अजिंक्य देव, निळू फुले, रमेश देव, कुलदीप पवार आणि सीमा देव यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या.

फर्जंद - छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सरदार कोंडाजी फर्जंद आणि पन्हाळा किल्ला काबीज करण्यासाठी मूठभर मावळ्यांच्या मदतीने दिलेल्या झुंजीची संघर्षमय गाथा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने 'फर्जंद' सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे.

फतेशिखस्त - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणाऱ्या आणि मराठय़ांच्या गनिमी गाव्याच्या युद्धनीतीची विस्तृत मांडणी करणाऱ्या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' नोव्हेंबर २०१९ मध्ये आला होता।

हिरकणी - मराठी चित्रपसृष्टीमधील दिग्दर्शक व अभिनेता प्रसाद ओकचा ‘हिरकणी’ हा ऐतिहासीक चित्रपट २४ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीने ‘हिरकणी’ ही मुख्य भूमिका साकारली. प्रसाद ओक यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.


'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' हा ऐतिहासिकपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकर यांनी केली आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment