'SBI' चे गृह कर्जे स्वस्त होणार

'SBI' चे  गृह कर्जे स्वस्त होणार
 रिझर्व्ह बँकेने पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवल्यानंतरही भारतीय स्टेट बँकेने व्याजदरात (MCLR) ०. ०५ टक्क्याची कपात केली आहे. या कपातीनंतर एक वर्षासाठीचा MCLR आता ७.९० टक्क्यांवरून ७.८५ टक्के झाला आहे. याशिवाय बँकेने मुदत ठेवींच्या दरात ०.१० टक्के ते ०.५० टक्क्यांची कपात केली आहे. चालू आर्थिक वर्षात बँकेने सलग नवव्यांदा MCLR दरात कपात केली आहे. नवे व्याजदर येत्या १० फेब्रुवारीपासून लागू होतील, असे बँकेने शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

'एसबीआय'ने सर्वच मुदतीच्या कर्जाचा दर (MCLR)०.०५ टक्क्याने कमी केला आहे. एक वर्षासाठीचा MCLR आता ७.९० टक्क्यावरून ७. ८५ टक्के झाला आहे. यामुळे गृह आणि वाहन कर्जाचे दर कमी होणार आहेत. कालच्या पतधोरणानंतर 'एसबीआय'ने पहिल्यांदा व्याजदरात बदल केला. बॅंकिंग व्यवस्ठेत रोकड सुलभता वाढल्याने ठेवी दरात कपात केली आहे. बँकेने मुदत ठेवींच्या दरात ०.१० टक्के ते ०.५० टक्क्यांची कपात केली आहे. ३१ डिसेंबर अखेर बँकेकडे ३१ लाख कोटींच्या ठेवी आहेत.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ बँकांनी ग्राहकांना द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मागिल दोन पतधोरण वगळता त्यापूर्वीच्या सलग पाच पतधोरणांमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी केला होता. मात्र बँकांकडून पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गुरुवारी पतधोरण धोरण आढाव्यात कोणत्याही दरांमध्ये बदल केला नाही.यामुळे रेपो दर व रिव्हर्स रेपो दर पूर्वीप्रमाणेच अनुक्रमे ५.१५ व ४.९० टक्के ठेवण्यात आला आहे. बँक दरही पूर्वीइतकाच ५.४० टक्के ठेवण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षातील शेवटचा पतधोरण आढावा सादर करताना आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, 'चलनवाढीचे चित्र अनिश्चित आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत चलनवाढ ५.१ टक्क्यांवरून ४.७ टक्क्यांवर येईल, असा अंदाज डिसेंबर २०१९मध्ये झालेल्या पतधोरण आढाव्यात आरबीआयने वर्तवला होता. आर्थिक वर्ष २०२०-२१च्या पहिल्या सहामाहीत चलनवाढ आणखी खाली येत ४ टक्के ते ३.८ टक्के यामध्ये राहिल. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीअखेर महागाई कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. गरज भासल्यास भावी काळात दरकपात केली जाईल. आरबीआयने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत.' मागील पाच पतधोरण आढाव्यांत आरबीआयने एकूण १.३५ टक्के दरकपात केली आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment