Redmi 8A सह 'या' स्मार्टफोन्सवर दमदार ऑफर्स

Redmi 8A सह 'या' स्मार्टफोन्सवर दमदार ऑफर्स
चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने  भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे. Xiaomi चे फोन भारतात सर्वाधिक विकले गेले आहेत. शाओमीने Mi Super Sale चे आयोजन केले आहे. हा सेल 8 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. शाओमीने आपल्या युजर्ससाठी दमदार ऑफर्स आणल्या आहेत. 16 फेब्रुवारीपर्यंत हा सेल सुरू असणार आहे. या सेलमध्ये शाओमीच्या Redmi 8A सह अनेक स्मार्टफोनवर दमदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत.
शाओमी रेडमी 8 ए या फोनवर Mi Super Sale मध्ये तब्बल 2000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. 7,999 रुपयांऐवजी 6,499 रुपयांमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच कार्डचा वापर केल्यास ग्राहकांनी आणखी सूट मिळणार आहे. खरेदीसाठी ICICI क्रेडिट कार्डचा वापर केला तर 5% की इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. या फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसाठी 6,999 रुपये (एमआरपी 8, 999) मोजावे लागणार आहेत.
Redmi Note 7 Pro, Redmi K20, Redmi Note 8 Pro, Redmi Note 8, Redmi K20 Pro, Redmi Go, Redmi Y3, Redmi Note 7S, Redmi 7 या फोन्सवर दमदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत. तसेच 2000 ते 6000 पर्यंत सूट देण्यात आली आहे. गॅजेट्सवर भन्नाट ऑफर्स देण्यात आल्या आहेत. रेडमी वाय 3 वर 4000 पर्यंत सूट देण्यात आली आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 7, 999 रुपयांना (एमआरपी - 11, 999) मिळत आहे. तसेच रेजमी 8 ए सारखंच फोनच्या खरेदीसाठी ICICI क्रेडिट कार्डचा वापर केला तर 5% की इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment