दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली असून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. हे सर्व रोखण्यामध्ये केंद्र सरकारची गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली आहे. जर तुमच्याकडून दंगली नियंत्रणात येत नसतील तर तुम्ही सत्ता सोडायला हवी असंही, रजनीकांत यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.
जनीकांत म्हणाले, “यामध्ये कुठे ना कुठे केंद्राचंच अपयश आहे. जर आपल्याकडून दंगली नियंत्रणात येत नसतील तर आपल्याला सत्ता सोडायला हवी.” मात्र, यामध्ये त्यांनी कोणाचेही प्रत्यक्ष नाव घेतले नाही. ते पुढे म्हणाले, “समान्य लोकांबरोबरच दिल्ली पोलीस आणि आयबीच्या अधिकाऱ्याचाही यात मृत्यू झाला आहे. ही छोटी गोष्ट नाही.”
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दाखला देताना रजनीकांत म्हणाले, “जेव्हा ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा तर सरकारला सावध रहायला हवं होतं. गुप्तचर यंत्रणांनी आपलं काम योग्य प्रकारे केलं नाही. हिंसाचाराशी कठोरपणे दोन हात करायला पाहिजे होतं.”
निषेध आंदोलन हिंसक असता कामा नये असंही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितलं. तसेच आपल्या जुन्या विधानाचा पुनरुच्चार करताना त्यांनी म्हटलं की, जर सीएएचा मुस्लिमांवर परिणाम होणार असेल तर मी मुस्लिमांसोबत आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment