गेल्या तीन दिवसापासून अमरावती जिल्हात ढगाळ वातावरण पसरले होते. आज सकाळी अमरावती शहरात व ग्रामीण भागात 15 मिनिटं पावसाच्या जोरात सरी कोसळल्या. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वाकला तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली होती. खरंतर हा अचानक पडलेला पाऊस गहू, हरभरा या पिकांना नुकसान नसून पोषक ठरणार आहे. सकाळपासून जिल्हात ढगाळ वातावरण कायम आहे. तर नागपुरातही रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
गेल्या वर्षभरात हवामानामध्ये अनेक बदल झाले आहेत. यंदाच्या वर्षाची सुरुवात थंडीने झाल्याने मुंबईकर चांगलेच आनंदात होते. पण आता थंडीचा पारा घसरून येत्या आठवड्यात विदर्भात काही भागांत विजेच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आला होता. त्यानुसार राज्यात नागपूर, अमरावतीत पावसाला सुरुवात झाली आहे.
पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा संगम होत असल्याने विदर्भात पावसाला पोषक हवामान आहे. विदर्भासह, मराठवाड्यात गेल्या 3 दिवसांपासून ढगाळ हवामान होतं. विदर्भात अनेक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कर्नाटक परिसरावर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम होत असल्याने विदर्भासह मध्य भारतात पावसाला पोषक हवामान होत आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment