पाणिपुरी मद्दे सडलेले बटाटे व चटणीसाठी टाकण्यात येणारे कलर स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत जप्त

पाणिपुरी मद्दे सडलेले बटाटे व चटणीसाठी टाकण्यात येणारे कलर स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत  जप्त 

महापालिकेच्या सातपूर विभागातील घनकचरा व्यवस्थापनाकडून स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत बजरंगनगर मळे परिसरात पाहणी दौरा सुरू होता. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीत पाणी पुरीकरिता लागणारे निकृष्ट दर्जाचे साहित्य मिळून आले. 

पाणीपुरी म्हटलं तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. सायंकाळी तर पाणीपुरीच्या गाडीवर अक्षरश: गर्दी उसळते. मात्र, पाणीपुरीसाठी वापरले जाणारे पदार्थ खरेच चांगले आहेत, याची कुणी कधी पडताळणी करीत नाही. सडलेले बटाटे, कलरमिश्रित चटणी, उघड्यावर पडलेल्या पुऱ्या, कळस गाठलेली अस्वच्छता, असे सर्वांचे मिश्रण असलेली पाणीपुरी विक्री करणाऱ्या विक्रेत्याचा माल बुधवारी (दि. ६) सातपूर भागात महापालिकेच्या पथकाकडून नष्ट करण्यात आला. दरम्यान, एफडीएकडून शहरात खाद्यपदार्थांच्या दर्जाची नियमित तपासणी होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
यानंतर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी माधुरी तांबे यांनी निकृष्ट असलेले खाद्यपदार्थ नष्ट केले. सडलेले बटाटे व चटणीसाठी टाकण्यात येणारे कलर जप्त केले. तसेच ज्या ठिकाणी पाणीपुरीला लागणारे खाद्यपदार्थ बनविले जात होते, त्या ठिकाणी अस्वच्छता असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचा प्रकार पाणीपुरीवाले करीत असल्याचा आरोप मनपा अधिकाऱ्यांनी केला. यामुळे तुम्ही पाणी पुरी खाताय, पण जरा जपून असे आवाहन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. या तपासणी मोहिमेत स्वच्छता निरीक्षक अशोक उशिरे, एकनाथ ताठे, प्रल्हाद जैसकर, संतोष काळे आदींचा समावेश होता.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment