सोढी यांच्या माहितीनुसार अमूल दुधाच्या दरात 4 ते 5 रुपयांची तर अमूलच्या दूध उत्पादनांच्या दरात 7 ते 8 रुपयांची वाढ होऊ शकते. ज्या कंपन्यांकडे दूध जास्त पुरवठ्याची क्षमता आहे त्यांना 2020मध्ये मोठा फायदा होईल अशी प्रतिक्रिया सोढी यांनी दिली आहे.संपूर्ण देशात महागाईचा भडका उडाला आहे. त्यातच सामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री बसण्याची शक्यता आहे. रोजच्या जीवनातील एका महत्त्वपूर्ण गोष्टीच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. देशातील नामांकित कंपनी ‘अमूल’ (Amul) दुधाचे दर वाढवण्याची शक्यता आहे. ‘अमूल’चे मॅनेजिंग डायरेक्टर आरएस सोढी यांनी CNBC TV-18 ला दिलेल्या खास मुलाखतीत ही माहिती दिली.
दरवाढीची कारणं
दूध उत्पादक कंपन्यांनी गेल्या 3 वर्षात दोनवेळा दुधाचे दर वाढवले आहेत. याचा परिणाम दुध उत्पादक शेतकऱ्याच्या वार्षिक उत्पन्नावर झाला आहे. शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न 2018च्या तुलनेत 25 ते 30 टक्क्यांनी वाढलं आहे. 2019मध्ये मदर डेअरी या दूध कंपनीने दूधाच्या दरात 3 रुपयांची वाढ केली होती तर अमूलने सुद्धा 2 दूधदरात रुपयांची वाढ केल्याची घोषणा केली होती.
अमूलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षात 2 वेळा दुधाच्या किंमतीत बदल केला आहे. जनावरांना घालण्यात येणाऱ्या चाऱ्याच्या किंमतीत यंदा काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे दूध उत्पादनासाठी लागणाऱ्या इतर घटकांच्या किंमतीही वाढल्या आहेत. परिणामी दुधाच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय अमूलकडून घेण्यात आला आहे.
सरकारी योजनांचा दूध उत्पादनाला फायदा
1 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात (budget 2020) केंद्र सरकारने दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी अनेक घोषणा केल्या असल्याचं देखील आरएस सोढी म्हणाले. दूध प्रक्रियेचा दर 2025 पर्यंत 53.5 मिलियन मेट्रिक टनवरुन दुप्पट म्हणजेच 108 मिलियन मेट्रिक टन करण्याचा मानस आहे. याकरता 40 ते 50 हजार कोटींची गुंतवणूक आवश्यक असल्याची माहिती सोढी यांनी दिली आहे. सरकारने जाहीर केलेल्या अनेक योजनांचं सोढी यांनी कौतुक केलं आहे. सरकारने कृषी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कृषी उडान’ आणि ‘किसान रेल’ या योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये कृषी उत्पादनं एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर पोहोचवणं अधिक सुखकर होणार आहे. सरकार ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देत असल्याची प्रतिक्रिया सोढी यांनी दिली आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment