![]() |
छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला |
मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात लावण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काँग्रेस सरकारने काढल्यामुळे अनेक शिवप्रेमी कार्यकर्ते नाराज झाले आहेत. काही हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी छिंदवाडा-नागपूर हायवे रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शिवरायांचा अपमान केल्यामुळे परिसरातील दुकाने बंद करण्यात आली होती. या आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की, मध्य प्रदेश सरकारने जाणूनबुजून शिवाजी महाराजांची मूर्ती हटवली. मात्र मूर्ती स्थापन करण्याची कोणतीही परवानगी न घेतल्याने ही कारवाई केल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यामध्ये काही अधिकारी पोलीस प्रशासनाच्या मदतीने बुलडोझरच्या सहाय्याने शिवाजी महाराजांची मूर्ती असलेला चौथरा तोडताना दिसत आहे. मात्र या कारवाईमुळे भाजपाने शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे गौरव आणि आराध्य दैवत आहेत. त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. जर कोणालाही आक्षेप असता तर सन्मानपूर्वक मार्गाने हा चौथरा हटवू शकत होते मात्र मध्य प्रदेश सरकारला महापुरुषांचा अपमान करणे गर्वाचे वाटते असा आरोप माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी केला आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment