11 धरणं पाईपलाईनने जोडणं किती व्यवहार्य?

11 धरणं पाईपलाईनने जोडणं किती व्यवहार्य?

पाणीपुरवठा मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार मराठवाडा वॉटर ग्रिड योजना पूर्ण केली जाईल. मात्र अजित पवारांप्रमाणेच या योजनेच्या व्यवहार्यतेवर जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांसारख्या जाणकारांनीही शंका उपस्थित केलीय.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना होती. मात्र मराठवाडा वॉटर ग्रिड योजनेला स्थगिती देण्यात आली नसल्याची माहिती राज्याचे विद्यमान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
गुलाबराव पाटील म्हणाले, "मराठवाडा वॉटर ग्रिडला स्थगिती तर देण्यात आली नाहीच, उलट वॉटर ग्रिड योजना आणि इतर योजना यावर आता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येतेय. मागच्या सरकारनं प्रस्तावित केलेली योजना तपासा, त्यामध्ये तांत्रिक गोष्टी पाहा, पाण्याचे स्रोत पाहा, एवढीच सूचना अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून केलीय."
हा वॉटर ग्रिड प्रकल्प काय आहे? तो किती व्यवहार्य?आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पामुळे खरंच मराठवाड्याची तहान भागणार आहे का?

मराठवाडा वॉटर ग्रिड योजना नेमकी काय आहे?
मराठवाड्यातील दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन 2016 साली तत्कालीन राज्य सरकारनं मराठवाडा वॉटर ग्रिड योजनेची घोषणा केली. दुष्काळग्रस्त आणि टंचाईग्रस्त मराठवाड्याची पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्याचा उद्देश यामागे आहे.
योजनेची माहिती, वैशिष्ट्य, आवश्यकता आणि तरतुदीकडे वळण्याआधी ही योजना किती भूभागासाठी, किती लोकांसाठी लागू असेल, हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार पाहू.
ही योजना मराठवाड्यातील एकूण 64 हजार 590 चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी असेल. 79 शहर, 76 तालुके आणि 12 हजार 978 गावांचा या योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश असेल.
2011च्या लोकसंख्येची आकडेवारी गृहित धरल्यास 53.96 लाख शहरी आणि 133.36 लाख ग्रामीण म्हणजेच 187.32 लाख लोकसंख्या या लाभक्षेत्रात येते.
मराठावाडा वॉटर ग्रिड योजनेअंतर्गत मराठवाड्यातील 11 धरणं एकमेकांशी लूप पद्धतीनं जोडली जातील. त्यासाठी 1,330 किलोमीटर पाईपलाईन टाकली जाईल.
यात जायकवाडी (औरंगाबाद), येलदरी (परभणी), सिद्धेश्वर (हिंगोली), माजलगाव (बीड), मांजरा (बीड), ऊर्ध्व पैनगंगा (यवतमाळ), निम्न तेरणा (उस्मानाबाद), निम्न मण्यार (नांदेड), विष्णूपुरी (नांदेड), निम्न दुधना (परभणी) आणि सिना कोळेगाव (उस्मानाबाद) या धरणांचा समावेश आहे.यापैकी उर्ध्व पैनगंगा धरण विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात येतं. मात्र या धरणाचं लाभक्षेत्र मराठवाड्यातील भागच आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment