![]() |
औरंगाबादकराना सहा दिवसातून एकदा पाणी मिळते, वर्षभराचा पाण्याचा कर ..... |
जायकवाडी प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असुन पण औरंगाबादकराना सहा दिवसातून एकदा पाणी मिळते. महापालिका पूर्णं वर्षभराचा पाण्याचा कर नागरिकांकडून वसुल करते एखाद्या नागरिकांकडून कर भरल्या गेला नाही तर त्याचे नळ कनेक्शन कापल्या जाते. जायकवाडीचे पाणी टॅकरद्वारे विकण्याचे काम हे स्थानिक आमदार. नगरसेवक. आणि महापालिका अधिकारी यांच्या सगनमताने चालु आहे. पण महापालिका जाणूनबूजून याकडे दुर्लक्ष करत आहे आणि महापालिकेची तिजोरी आणि जनतेचा पैसा लुटण्यासाठी वेळकाढु पणा करत आहे. असेच चालु राहिल्यास नागरिकांना महिन्यालाच पाणी मिळेल. ही अतिशय गंभीर समस्या आहे. हा सर्व भ्रष्टाचार बंद होऊन नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे अशी व्यवस्था करायला हवी. मनिष नरवडे जिल्हा अध्यक्ष रिपाइं (खरात) विद्यार्थी औरंगाबाद
0 comments:
Post a Comment
Please add comment