![]() |
घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; ९ जण भाजले |
कांदिवली पूर्वेकडील संभाजी नगर येथील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ९ जण भाजले आहेत. जखमींना उपचारासाठी कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जानुपाडा परिसरातील गवारे चाळीतील कानडे यांच्या घरात हा स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की कानडे कुटुंबातील सदस्यांबरोबच शेजारचे काही लोकही जखमी झाले. हे सर्व जखमी २० ते २५ टक्के भाजले आहेत. त्यांना मोबाइल व्हॅनमधून तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कांदिवली फायर ब्रिगेडचे वरिष्ठ अधिकारी धांडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले व पुढील मदतकार्य केले.
0 comments:
Post a Comment
Please add comment