![]() |
Google Maps ला 15 वर्ष पूर्ण हातात कागद घेऊन एखाद्याचा पत्ता विचारणारी माणसे आता बॉलिवूड सिनेमांमध्येच पाहायला मिळतात. याला कारण म्हणजे Google Maps ने लोकांची अनेक कामे सोपी झाली आहेत. एखाद्या अनोळखी ठिकाणी जायचं असो किंवा हॉटेल, एटीएम, पेट्रोल पंप यांसारख्या बाबींची आवश्यकता असेल तर हाताची बोटं आपोआप गुगल मॅप्सकडे वळतात.याच गुगल मॅपला आज 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. |
15 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने नवीन लोगो सादर केला आहे. यासोबतच मॅप्ससाठी काही नवे फीचर्सही रोलआऊट करण्यात आले आहेत. Google Maps च्या जुन्या आयकॉनमध्ये मॅप आणि एक लोकेशन पिन केलेले दिसायचे. तर नव्या लोगोमध्ये मिनिमल डिझाइन व्हाइट बॅकग्राउंड आणि राउंड edges दिले आहेत. हा लोगो बराच कलरफुल बनवण्यात आला आहे. कंपनीचे CEO सुंदर पिचाई यांनी एक ब्लॉग लिहून Google Maps ला शुभेच्छा दिल्या आहेत. Google Maps मुळे लोकांचं जीवन सोपं झाल्याचं त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिलंय. याशिवाय, फुड डिलिव्हरी करणारे मॅप्सद्वारे तुमच्यापर्यंत जेवण कसं पोहोचवतात हे देखील लिहिलंय. “१५ व्या जन्मदिवसाच्या शुभेच्या गुगल मॅप्स…आजपर्यंत मॅप्समुळे मी ज्याठिकाणी माझ्या आवडीचे व्हेज बरितो(खास डिश) खाऊ शकलो त्या जागा दाखवतोय”, असं त्यांनी लिहिलंय.
Google Mapsमध्ये नवे फीचर्स –
नव्या आयकॉनसोबत मॅप्समध्ये एक्सप्लोर, कम्यूट, Saved, कन्ट्रिब्यूट आणि अपडेट्स मोड हे नवे टॅब दिले आहेत. एक्सप्लोर टॅबद्वारे एखाद्या लोकेशनच्या आजूबाजूच्या जागा सर्च करता येतील. कम्यूट टॅबद्वारे कुठेही जाण्याचा रस्ता शोधता येईल. Saved पर्यायामध्ये जर एकदा तुम्ही घराचा आणि ऑफिसचा पत्ता टाकला तर मॅपवर सेव्ह होईल. अपडेट्स टॅबमध्ये युजर्सना जवळचे खास स्पॉट दाखवले जातील. तर, कन्ट्रिब्यूट टॅबमध्ये तुम्ही कुठलाही फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करु शकतात. यामुळे एखादं ठिकाण कसं आहे याची माहिती सर्व युजर्सना मिळेल.
0 comments:
Post a Comment
Please add comment