गॅस गिझर झाला मुत्यूचा सापळा

गॅस गिझर झाला मुत्यूचा सापळा
पुण्यात एका तरुणाचा गॅस गिझरमधून वायुगळती झाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. कोथरुडमध्ये ही घटना घडली आहे. रामराजे किशोर संकपाळ (30) असं या तरुणाचं नाव आहे. तो कोथरुडमधल्या एका सोसायटीत राहात होता. या घटनामुळे परिसात गॅस गिझरच्या सुरक्षिततेविषयी शंका व्यक्त केली जातेय. संकपाळ हा आंघोळीसाठी गेला होता. त्यावेळी गॅसची गळती झाली आणि गुदमरून त्याचा मृत्य झाल्याचं उघड झालंय. आंघोळीसाठी गेल्यावरही तो लवकर बाहेर आला नसल्याने शेवटी अग्निशमन विभागाला बोलविण्यात आलं होतं.गॅस गिझरमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पुढे आलंय. 
त्यांनी बाथरुमचं दार तोडून संकपाळला बाहेर काढलं. तो मुलांची ट्युशन घेण्याचं काम करत होता. इलेक्ट्रीक गिझरमुळे वीज जास्त लागते. त्यामुळे बीलही जास्त येतं. यामुळे गॅस गिझर लावलं जातं. मात्र सुरक्षेसाठी ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे त्या केल्या जात नाही. त्यामुळे अपघात घडतात असा अंदाज व्यक्त केला जातोय. या आधीही मुंबई आणि नागपूरमध्ये अशाच घटना घडल्या होत्या.
मुंबईतही घडली होती घटना
मुंबईतही 14 जानेवारीला अशीच घटना घडली होती. बोरिवलीत दहावीत शिकणाऱ्या मुलीचा बाथरुममध्ये गॅस गिझरमुळं गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गॅस जळताना कार्बन मोनॉक्साईडचं उत्सर्जन होतं आणि तेच तिच्या जीवावर बेतलं.
ध्रुवी गोहिल असं या मुलीचं नाव आहे. ध्रुवीच्या  मृत्यूनं बोरिवलीत राहणाऱ्या  गोहिल कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसलाय.  दहावीत  शिकणारी त्यांची  ध्रुवी आता या जगात राहिली नाही. बाथरुमधील गॅस गिझरमुळं गुदमरुन तिचा मृत्यू झालाय. रविवारी सकाळी पावणे सात वाजता ती आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली होती. मात्र, गुदमरल्यामुळं ती बेशुद्ध पडली.
बराचवेळ झाला तरी ध्रुवी बाथरुम बाहेर न आल्यामुळं कुटुंबियांना  शंका आली. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. जवळपास  एक तासभर मुलगी आत होती. मदत करु शकलो नाही, त्यामुळे तिच्या आईने टाहो फोडला.
गिझरमध्ये गॅसचं ज्वलन होत असताना आजूबाजूच्या परिसरातील ऑक्सिजन शोषून घेतला जातो. तसंच कार्बन मोनॉक्साईडचं उत्सर्जन होतं. बाथरूम बंद असल्यास कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढतं आणि आंघोळीसाठी गेलेली व्यक्ती बेशुद्ध होण्याची शक्यता असते.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment