शेतकऱ्यांविरुद्धचे फौजदारी खटले मागे

शेतकऱ्यांविरुद्धचे फौजदारी खटले मागे



राज्यातील शेतकऱ्यांविरुद्धचे फौजदारी खटले शासन निर्णयानुसार मागे घेण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिकेवर चार आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.
आंदोलने करणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांवर विविध शहरांतील पोलिस ठाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याची माहिती याचिकाकर्ता विविध माध्यमांद्वारे गोळा करीत आहेत. दरम्यान, बुधवारी जनहित याचिका सुनावणीस निघाली असता न्यायालयात माहिती सादर करण्यासाठी वेळ देण्याची विनंती शेतकरी युवा संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित बबनराव काळे यांनी केली असता खंडपीठाने याचिकेची पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर ठेवली आहे. आंदोलनात जीवित हानी झाली नसलेल्या तसेच सार्वजनिक व खासगी मालमत्तांची पाच लाखांपेक्षा कमी वित्तहानी झालेल्या घटनांमधील २०१४ पूर्वीचे फौजदारी खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याचा लाभ देत राज्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले शेतकऱ्यांविरुद्धचे खटले मागे घेण्याची विनंती याचिकाकर्त्याने केली आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment