अत्यंत क्रूर, निदर्यतेने IB अधिकाऱ्याची हत्या

दिल्लीत हिंसाचार सुरु असताना, दुसऱ्यांना वाचवण्यासाठी घराबाहेर पडलेल्या इंटेलिजन्स ब्युरोच्या एका अधिकाऱ्याचीही हत्या करण्यात आली. या अधिकाऱ्याचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. हिंसक झालेल्या जमावाने या अधिकाऱ्याची अत्यंत क्रूर, निदर्यतेने हत्या केली. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या अधिकाऱ्याची भोसकून हत्या करण्यात आली तसेच त्याच्या शरीरावर २०० जखमा आढळल्या आहेत.
हिंसक जमावाने या अधिकाऱ्याचा आधी छळ केला नंतर त्याची हत्या केल्याचा अंदाज आहे. या अधिकाऱ्याचा मृतदेह घरापासून एक किमी अंतरावर असलेल्या एका नाल्यामध्ये सापडला. आयबी अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी आम आदमी पार्टीचा नगरसेवक ताहीर हुसैनविरोधात गुरुवारी एफआयआर नोंदवण्यात आला. वडिलांच्या तक्रारीवरुन दयालपूर पोलीस ठाण्यात हा एफआयआर नोंदवण्यात आला.
पोलीस चौकशी पूर्ण होईपर्यंत आपने ताहीर हुसैनला पक्षातून निलंबित केले आहे. उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचारातील मृतांचा आकडा ३८ पर्यंत पोहोचला आहे. मंगळवारी रात्रीपासून कुठेही हिंसाचाराची घटना घडलेली नाही. दिल्ली पोलिसांनी ४८ एफआयआर नोंदवले असून १३० जणांना अटक केली आहे.
या अधिकाऱ्याची आई काय म्हणाली?

तो नुकताच कामावरुन घरी आला होता. मी त्याच्यासाठी चहा ठेवला होता. तितक्यात शेजारी घरी धावात आले व हिंसक झालेला जमाव बाहेर लोकांची हत्या करतोय असे सांगितले. तो तसाच त्यांच्यासोबत बाहेर पडला. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, निदान चहा तरी पिऊन जा असे मी त्याला सांगितले. पण इतरांना वाचवण्यासाठी तो शेजाऱ्यांसोबत घराबाहेर पडला. त्यानंतर जमावाने त्याला खेचून नेले. माझ्या मुलाची त्यांनी हत्या केली असे दिल्लीतील हिंसाचारात ठार झालेल्या त्या अधिकाऱ्याच्या आईने सांगितले.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment