तळोजा येथील सेक्टर ९ मध्ये असलेल्या एका इमारतीत एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडले आहेत. उपाध्याय असं या कुटुंबीयांचं नाव आहे. या सगळ्यांनी गळफास घेऊन दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. कारण हे सगळे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहेत. तळोजा या ठिकाणी असलेल्या सेक्टर ९ मधील शिव कॉर्नर सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. या मृतदेहांमध्ये पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. हे कुटुंब इथे भाडे तत्त्वार रहात होते. हे घर राजेश भारतद्वाज यांच्या नावावर आहे. तिथे उपाध्याय हे कुटुंब भाडेतत्त्वावर रहात होते. दोन महिन्यांपूर्वी या कुटुंबाने आत्महत्या केली असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या होऊनही सोसायटीत कुणालाही पत्ता कसा लागला नाही? याबाबतचं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment
Please add comment