हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून शिवसेनाला दूर नेण्यात येत आहे

 हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून शिवसेनाला दूर नेण्यात येत आहे 

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात पाटील यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बुधवारी भेट घेतली. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून शिवसेनाला दूर नेण्यात येत असून, ही पोकळ‌ी मनसेचे राज ठाकरे यांना भरू द्यायची, हे काळाच्या ओघात सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी काँग्रेसचे हे षड्‌यंत्र समजून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी ठाकरे यांना केले. 'सध्याच्या परिस्थितीत सावरकरांना भारतरत्न द्या, ३७० कलम रद्द झाले पाहिजे, रामजन्मभूमी मुक्त झाली पाहिजे, हे कोणीतरी बोलले पाहिजे, आणि ते मांडणारा एक गट मनसेच्या निमित्ताने तयार करण्यात येत आहे. मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली असून, आम्ही त्याचे स्वागत करतो आहोत. मी मुंबईकर असून, शिवसेनेचे मुंबईतील मराठी माणसाचे योगदान माहिती आहे. शिवसेना मुंबईत होती म्हणून मराठी, हिंदू माणूस वाचला. अनेक दंगलीमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते मोहल्ल्यांमध्ये नागरिकांना सुरक्षितता पुरवित होते; हे आपण पाहिले आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या पोक‌ळीत मनसेला आणण्याचा प्रयत्न आहे', असे पाटील म्हणाले.

'शिवसेनेला अत्यंत नियोजनपूर्वक हिंदुत्वापासून दूर नेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असून, त्यामुळे निर्माण होणारी पोकळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भरली जात आहे. याषड्‌यंत्रामुळे शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून बाजूला पडत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्षात घ्यावे,' असा 'मित्रत्वाचा' सल्ला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सेनेला दिला.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment