![]() |
पुणे बीआरटी प्रकल्प बंद होणार |
BRT अर्थात बस रॅपिड ट्रान्झिट्स...पुणेकरांचा पीएमपी बस प्रवास अधिक जलद व्हावा, या उद्देशाने 3 डिसेंबर 2006साली मोठा गाजावाजा करून देशातला पहिला बीआरटी प्रकल्प पुण्यात सुरू झाला खरा पण नियोजनाच्या अभावामुळे प्रारंभीपासूनच हा प्रकल्प कायमच वादात सापडत राहिला. आधी अपघातांच्या मालिकेनं बीआरटी बदनाम झाली आणि नंतर राजकीय पक्षांची अनास्था. या अशा एक ना अनेक कारणांमुळे बीआरटी अक्षरशः बट्ट्याबोळ झालाय. कदाचित म्हणूनच पुण्याचे नवे आयुक्त शेखर गायकवाड यांनी या महात्वाकांक्षी प्रकल्पाचा फेरआढावा घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत.
देशातला पहिला बीआरटी प्रकल्प ठरलेला पुणे बीआरटी प्रकल्प आता गुंडाळण्याचे स्पष्ट स्पष्ट संकेत पुणे मनपाकडून मिळत आहेत. सामान्य पुणेकर पीएमपी प्रवाशांनी मात्र बीआरटी प्रकल्प बंद करण्यास तीव्र विरोध केलाय. प्रकल्प बंदच करायचा होता तर मग त्यावर आजवर 1200 कोटी खर्च केलेच कशाला असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत.
0 comments:
Post a Comment
Please add comment