![]() |
दोन लाखांवरील कर्जदारांसाठी मोठी बातमी |
दोन लाखांपर्यंतच्या कर्जदारांची यादी 15 फेब्रुवारीनंतर प्रसिध्द केली जाणार आहे. मेपर्यंत या कर्जदारांना कर्जमाफीचा संपूर्ण लाभ देण्याचे नियोजन महाविकास आघाडी सरकारने केले आहे.
तर दोन लाखांवरील कर्जदारांच्या निर्णयासाठी नियुक्त अभ्यास समितीच्या दोन बैठका पार पडल्या असून पुढील आठवड्यात निर्णायक बैठक होणार आहे. खरीप हंगामात थकबाकीदारांना बॅंकांकडून नव्याने कर्ज मिळावे, या हेतूने ही समिती फेब्रुवारीअखेर अंतिम निर्णय जाहीर करेल, असा विश्वास सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या सुमारे 29 लाख शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाने बॅंकांकडून मागवून घेतली आहे.
खरीप हंगाम काही महिन्यांवर राहिला असतानाच थकबाकीदार शेतकऱ्यांना बॅंकांकडून नव्याने कर्ज मिळावे यादृष्टीने सरकारने नियोजन केले आहे. दोन लाखांवरील कर्जदारांसाठी एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) लागू केली करुन त्याअंतर्गत कर्जाची परतफेड करण्यासाठी हप्ते पाडून दिले जातील.
तत्पूर्वी, त्यांना दोन लाखांचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी काही बॅंकांचे व कृषीतज्ज्ञांचे अभिप्रायही या समितीने घेतल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अभ्यास समितीच्या दोन बैठका पार पडल्या असून पुढील आठवड्यात बैठक होणार असून लवकरच समिती निर्णय जाहीर करेल, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
मेपर्यंत मिळणार कर्जमाफीची रक्कम : दोन लाखांपर्यंतच्या कर्जदारांची यादी 15 फेब्रुवारीनंतर प्रसिध्द होईल. मेपर्यंत या कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
2014 cha maz krj maf zal nahi tyach kay mg
ReplyDelete