वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथे एका तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी शाळेमध्ये शिक्षिका आहे. तरुणीचं वय 30वर्षे असल्याची माहिती आहे. आज सकाळी 7.30 वाजता ही घटना घडली आहे. यामध्ये तरुणी 20 ते 30 टक्के भाजली असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंदोरी नाक्याजवळ पीडित तरुणीच्या गावातील 2 तरुण आणि पीडिता यांच्या शाब्दिक वाद झाला. त्यानंतर तरुणांनी तिला भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.
स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पीडितेला वाचवलं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला उपचारार्थ नागपूर येथे दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. यावरून आता राज्यात कायद्याची भीती राहिलीच नाही असंच म्हणावे लागेल.
0 comments:
Post a Comment
Please add comment