भोपाळ रेल्वे स्टेशनच्या ओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळला

भोपाळ रेल्वे स्टेशनच्या ओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळला


भोपाळ रेल्वे स्टेशनवर (Bhopal Railway Station) एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील स्टेशनवर ओव्हरब्रिजच्या पायऱ्या कोसळल्याने तब्बल 9 प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी एका प्रवाशाची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रेल्वे आणि प्रशासन सर्वांना तातड़ीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे. सध्या ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे. हा ब्रिज कसा कोसळला, याच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील CSMT स्थानकाजवळी प्रवाशांसाठी असलेला फूट ओव्हर ब्रिज कोसळला होता. यामुळे अनेक जणं जखमी झाले होते. बुधवारी भोपाळ स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर ओव्हरब्रिज पायर्‍या अचानक कोसळल्या. यामुळे पायऱ्यांवरील प्रवासी थेट खाली कोसळून ढिगाऱ्यात अडकले. येथे सकाळच्या वेळेत प्रवाशांची गजबज असते. अशावेळात ही दुर्घटना घडल्याने रेल्वे परिसरात खळबळ झाली आहे. या स्टेशनवरील अनेक ब्रिज खिऴखिळे झाले आहेत. यामुळे अनेक प्रवासी ढिगाऱ्याखाली अडकले. यापैकी 7 ते 8 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. यापैकी एका प्रवासाची प्रकृती गंभीर आहे. जखमींना भोपाळमधील हमीदिया रुग्णालय आणि जुन्या भोपाळच्या चिरायु रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले कर्मचारी आणि स्टेशनवर उपस्थित प्रवाशांनी विलंब न करता ऑटो आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलविले.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment