मुंबई-गोवा हायवेवर अपघात

मुंबई-गोवा हायवेवर एक कार पुलावरून कोसळून झालेल्या भीषण अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना पेण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई-गोवा हायवेवर अपघात 

अपघातग्रस्त (एमएच ०५ इए ५५७६) ही कार कल्याणहून श्रीवर्धनच्या दिशेनं चालली होती. हॉटेल झी गार्डनसमोरच्या पुलावर असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार १५ फूट उंचीवरून खाली कोसळली. त्यात तिघे जखमी झाले. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. त्याला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. संध्या नथू पाटील, प्रीती दत्तू कडवे, राजेश शशिकांत मोरे अशी जखमींची नावं आहेत.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment