![]() |
धर्मांध मुसलमानांकडून हिंदू मनाची लिटमस टेस्ट केली जातीये का ? |
१९ जानेवारी १९९० च्या रात्री ९/१० च्या सुमारास सगळा काश्मीर शांत झोपलेला असताना धर्मांध मुसलमान फक्त एखाद्या रस्त्यावर नाही , एखाद्या मोहल्ल्यात नाही तर संपूर्ण काश्मीर मध्ये लाखोंच्या संख्येने पूर्वनियोजित कट करून रस्त्यावर उतरले. सर्वत्र हजारो मशिदींमधून अल्लाहुअकबर च्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या त्या पाठोपाठ लाखो सशस्त्र युवक रस्त्यांवर अल्लाहुअकबर च्या घोषणा देऊ लागले. काश्मीर मधल्या हिंदूंच्या घरांवर पेट्रोल बॉम्ब पडू लागले. धडाधड दगड आपटू लागले. वीज व टेलिफोन च्या लाईन कापल्या. घरं दुकानं वाहनं पेटवून दिली जाऊ लागली. एक एका मोहल्ल्यात, गावात शेकडो नराधम घुसून काश्मीरी हिंदूंच्या हत्त्या करत होते. जाळपोळ करत होते. मशिदींमधून मोठमोठ्याने घोषणा दिल्या जात होत्या 'जीव वाचवायचा असेल तर हिंदूंनी ताबडतोब घरं दारं सोडून काश्मीर मधून निघून जावं' अश्या धमक्या दिल्या जात होत्या. आणि काळजाचा थरकाप करणारी निचतेची क्रूरतेची परिसीमा गाठणारी सर्वात महत्वाची घोषणा होती 'फक्त पुरुषांनी च चालते व्हा, तुमच्या बायका, बहिणी आणि मुलींना इथेच ठेवा'.
एकटे पुरुष पळून जात असतील तर त्यांना मारहाण करून पळून जाऊ दिलं जात होतं पण कोणी कुटुंब कबिला बायको पोरं बाळांना घेऊन जाताना दिसला तर त्याची हत्या आणि सोबत च्या बायकांचे बलात्कार होत होते. या धर्मांधतेचा क्रौर्यामध्ये ४ लाख हिंदू घर, संपत्ती, उद्द्योग, शेती सगळं सोडून एका रात्रीत पळून जावं लागलं. हे क्रौर्य हा नरसंहार पुढे आणखी काही दिवस सुरूच होतं . सख्खे भाऊ कुठे गेले, वडील मुले कुठे गेली, बहिणीला कोण कधी उचलून घेऊन गेलं आणि कोण कुठल्या दिशेला पळून गेलं कशाचा काही पत्ता नव्हता.
मूळचे काश्मिरी हिंदू असलेले पत्रकार, तसेच या सगळ्या क्रौर्याचे प्रत्यक्षदर्शी आणि त्या वरील पुस्तक 'Our Moon Has Blood Clots' चे लेखक श्री. राहुल पंडिता लिहितात कि हा सगळा भयावह प्रकार बाहेर सुरु असताना त्यांच्या आईने हातात चाकू घेतला आणि म्हणाली कि तुझ्या बहिणीला मारून मी स्वतःला संपवणार आहे. तुझं काय करायचं ते तू ठरव. शिलरक्षणासाठी स्त्रियांना आत्महत्त्या देखील कराव्या लागल्या आणि ज्या स्त्रिया, मुली त्या नराधमांच्या तावडीत सापडल्या त्यांचे हाल तर ना मी लिहू शकत आणि ना तुम्ही वाचू शकत असे आहेत. सामूहिक बलात्कारांनी आणि हत्यांनी काश्मीर रक्ताळलं होतं.
जे लोक जागा मिळेल तिथे लपून बसले होते त्यातल्या एका कुटुंबा कडे लहान बाळ होतं, त्यांनी बाळाच्या तोंडात पारलेजी ची बिस्किटे कोंबली कारण रस्त्यावर थैमान घालत असलेल्या धर्मांध मुसलमानांना या घरात कोणी आहे हे कळू नये म्हणून.
मुसलमानांच्या या धर्मांधतेचे काश्मीर मध्ये एका रात्रीत एक ना दोन, हजारो घटना , हजारो सत्यकथा, हजारो बळी आणि लाखो निर्वासित.
आज शाहिनबाग, JNU तसेच CAA NRC च्या विरोधातल्या सभांमध्ये 'हम क्या चाहते आजादी' च्या ज्या घोषणा दिल्या जातात तेव्हा हे पाहणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या आत्म्याचा थरकाप होतो कारण काश्मीर मध्ये हजारो हत्त्या करताना, हजारो बलात्कार करताना आणि ४ लाख लोकांना क्रूर पणे हाकलताना ह्या घोषणा सर्वात पहिले त्या रात्री दिल्या गेल्या. नवीन सप्रू सारख्या नवतरुण इंजिनीयरची क्रूर हत्त्या करून रस्त्यावर त्याचं प्रेत ठेऊन आणि अश्या अनेकांच्या प्रेतांच्या भोवती 'आजादी आजादी' असं गाणं गात हे मुसलमान गिधाडांसारखे फेऱ्या मारत होते.
मोहम्मद अली जिनाने केलेल्या 'डायरेक्ट ऍक्शन डे' सारखाच हा नरसंहार आणि मानवतेला लाजवणारा, माणुसकीची हत्त्या करणारा प्रकार काश्मीर मध्ये झाला होता.
"15 कोटी मुसलमान 100 कोटी हिंदूंना भारी पडतील" हे वाक्य जेव्हा बोललं जातं तेव्हा भीती वाटते कि डायरेक्ट ऍक्शन डे किंवा १९ जानेवारी चा काश्मीर मधली काळरात्र तसाच काही प्रकार पुन्हा पुन्हा या हिंदुस्थानात वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचा मुसलमान धर्मांधांचा कट तर सुरु नाहीये ना ? आणि अशी विधाने करून हिंदू समाजातून काय प्रतिक्रिया येतेय याचा ते अंदाज घेत आहेत का ? अश्या लिटमस टेस्ट वारंवार करून मग 'तो दिवस' ठरवणार आहेत का ?
या सगळ्याची आठवण करून देण्याची आवश्यकता आज या साठी वाटली.
खोट्या सेक्युलरिझम च्या आहारी गेलेल्या, ढोंगी बंधुत्वाची स्वप्ने पडणाऱ्या आणि आपापसात फूट पडलेल्या या हिंदू समाजावर येऊ घातलेले हे क्रूर संकट, याची कल्पना, याच्या क्रौर्याचा अंदाजही ज्या भोळ्या आणि मूर्ख हिंदू समाजाला नाहीये तो या संकटाचा सामना कसा करेल ?
अभय सोनावणे
0 comments:
Post a Comment
Please add comment