अमेरिकेत झालेल्या ‘अमेरिका गॉट टॅलेंट’ या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या स्पर्धेत वसई-भाईंदरच्या कलाकारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत सर्वोत्तम कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेत वसई-भाईंदर येथील ‘वी अनबिटेबल’ डान्स ग्रुपला आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. मागच्या वेळीही ‘अमेरिका गॉट टॅलेंट’मध्ये सहभागी होऊन त्यांनी स्थान पटकावले होते. मात्र त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या दुसऱ्या पर्वात या स्पर्धकांनी चित्तथरारक नृत्याविष्कार सादर करून अमेरिकेच्या रसिकांची मने जिंकली. या स्पर्धेत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कॅनडा या देशांसह विविध देशांतील ४० संघ सहभागी झाले होते. त्यामधून ‘वी अनबिटेबल ग्रूप’ने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी या नृत्यपथकाला प्रथम क्रमांक मिळाल्याची घोषण झाली, त्यावेळी परीक्षकांसह प्रेक्षकांनी उभे राहून टाळय़ांच्या गजरात या स्पर्धकांवर अभिनंदनाचा वर्षांव केला.
या स्पर्धकांनी यापूर्वी भारतातील विविध स्पर्धेत सहभागी होत आपले नृत्य कौशल्य दाखवले आहे. चित्तथरारक व श्वास रोखायला लावणारे स्टंट व नृत्य यांसाठी हे स्पर्धक प्रसिद्ध आहेत. ‘वी अनबिटेबल ग्रूप’मध्ये नायगाव व भाईंदरमधील ३० मुलांचा समावेश आहे. या मुलांनी स्वप्निल भोईर व ओमप्रकाश चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली आपली कला सादर केली.
0 comments:
Post a Comment
Please add comment