कोरोनाव्हायरसबाबत (Coronavirus) अनेक अफवा!

कोरोनाव्हायरसबाबत (Coronavirus) अनेक अफवा!

कोरोनाव्हायरसबाबत (Coronavirus) अनेक अफवा पसरत आहेत आणि अनेक गैरसमज निर्माण झालेत. लोकांचे असे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) केला आहे.

चीनहून आलेलं एखादं पत्र किंवा पॅकेज आलं ते तर घेणं सुरक्षित आहे? 
- हो चीनहून आलेलं पॅकेजमुळे तुम्हाला कोरोनाव्हायरसचा धोका नाही. पत्र किंवा पॅकेज अशा वस्तूंवर कोरोनाव्हायरस जास्त काळासाठी तग धरून राहत नाही, असं दिसून आलं आहे.

 हँडड्रायरमुळे कोरोनाव्हायरसचा नाश होतो का? 

- कोरोनाव्हायरसचा नाश करण्यासाठी हँडड्रायर परिणामकारक नाही. कोरोनाव्हायरसपासून वाचण्यासाठी तुम्ही वारंवार साबण किंवा हँडवॉशने वारंवार हात धुवायला हवेत. हात स्वच्छ झाल्यानंतर ते नीट कोरडे करा.

शरीरावरअल्कोहोल किंवा क्लोरिन लावल्याने कोरोनाव्हायरस नाश होतो का? 
- नाही. तुमच्या शरीरात कोरोनाव्हायरसने प्रवेश केला असेल, तर शरीरावर अल्कोहोल किंवा क्लोरीन लावल्याने व्हायरस मरत नाहीत. असं काही शरीरावर स्प्रे केल्यास हानीकारक ठरू शकतं. एखादी जागा किटाणूमुक्त करण्यासाठी तुम्ही अल्कोहोल, क्लोरिन वापरू शकता मात्र योग्य सल्ल्यानुसार त्याचा वापर करा.

न्यूमोनियाची लस कोरोनाव्हायरसपासून तुम्हाला संरक्षण देईल? 
- कोरोनाव्हायरसची सुरुवातीची लक्षणं न्युमोनियाप्रमाणे असली तरी हा व्हायरस नवा आणि वेगळा आहे. न्यूमोनियाची लस तुम्हाला कोरोनाव्हायरसपासून संरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे त्यासाठी त्याला मारक ठरेल अशा लसीची गरज आहे आणि कोरोनाव्हारसविरोधातील लस तयार करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत.

खाऱ्या पाण्याने नाक स्वच्छ केल्याने कोरोनाव्हायरसचा इन्फेक्शन होणार नाही? 
- दररोज खारट पाण्याने नाक स्वच्छ केल्याने साध्या सर्दीपासून आराम मिळतो, असे काही पुरावे आहेत. मात्र त्यामुळे श्वसनसंबंधी इन्फेक्शनपासून संरक्षण मिळेल असं अद्याप तरी दिसून आलं नाही. नियमित खारट पाण्याने नाक स्वच्छ केल्याने कोरोनाव्हायरसच्या इन्फेक्शनपासून संरक्षण मिळेल, असे पुरावे नाहीत.

माऊथवॉश कोरोनाव्हायरसपासून संरक्षण देतो? 
- काही माऊथवॉथ तुमच्या तोंडातील बॅक्टेरियांचा काही मिनिटांसाठी नाश करतात. मात्र यामुळे तुम्हाला कोरोनाव्हायरसपासून संरक्षण मिळले असं नाही.

लसूण खाल्ल्याने कोरनाव्हारसपासून संरक्षण मिळेल? 
-लसणीत अँटिबॅक्टेरिअय घटक असतात, लसूण खाल्ल्याने कोरोनाव्हायरसपासून संरक्षण मिळालं, असं अद्याप कुठे दिसून आलं नाही.


तिळाचं तेल लावल्याने कोरोनाव्हायरस शरीरात प्रवेश करणार नाही? 
- तिळाचं तेल कोरोनाव्हायरसचा नाश करू शकत नाही. काही रासायनिक कीटकनाशक जमीन किंवा एखाद्या वस्तूवरील कोरोनाव्हायरसचा नाश करू शकतं. मात्र त्वचेवरील व्हायरसवर त्याचा परिणाम होत नाही. उलट ते त्वचेसाठी घातकच ठरतील.

कोरोनाव्हायरसवर अँटिबायोटिक्सने उपचार होतात? 
- अँटिबायोट्किस व्हायरसवर नाही तर फक्त बॅक्टेरियांविरोधात प्रभावी आहे. कोरोनाव्हायरस हा व्हायरस आहे, म्हणजे अँटिबायोटिक्स प्रतिबंधात्मक उपचार म्हणून प्रभावी नाही. मात्र कोरोनाव्हायरस झाल्यानंतर रुग्णालयात असताना अँटिबायोटिक्स दिले जातात कारण तुम्हाला बॅक्टेरियअल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

 

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment