![]() |
बॉलिवूड अभिनेत्रीने चक्क केली दागिन्याच्या दुकानात चोरी |
बॉलिवूड अभिनेत्रीला दागिन्याच्या दुकानात चोरी करताना रंगेहाथ पकडले हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल... पण हे खरे आहे. पुण्यातील एका दुकानात चोरी करताना या अभिनेत्रीला पकडण्यात आले आहे. या घटनेची सध्या चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या स्नेहलता पाटील या अभिनेत्रीने एका सराफाच्या दुकानातून दोन अंगठ्या चोरल्या असून सीसीटिव्हीमध्ये तिची छबी कैद करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ माजली आहे. पुण्यातील कॅम्प परिसरातील एनआयएबीएम रोडवरील क्लोअर प्लाझा या मॉलमधील एका ज्वेलरीच्या दुकानात ही घटना घडली असून या दुकानात स्नेहलता दागिने घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने दुकानदाराचे लक्ष नसताना सोन्याच्या दोन अंगठ्या चोरल्या.
0 comments:
Post a Comment
Please add comment