आजचे राशीभविष्य

मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. नवीन योजनांमध्ये अधिक रस घ्याल. आवडत्या व्यक्तीसाठी तुमचा सहवास लाखमोलाचा असेल.

वृषभ : आजूबाजूच्या सर्वांशी सलोख्याचे नाते ठेवा. शेजाऱ्यांशी क्षुल्लक गोष्टीवरून वाद घालू नका. छोट्या व्यावसायिकांना धनलाभ होईल.

मिथुन : मित्रांच्या व्यावसायिक प्रगतीमुळे खूष व्हाल. कलेच्या क्षेत्रातील लोकांचे उत्तम कामगिरीमुळे कौतुक होईल. पैशाची उधळपट्टी करू नका.
कर्क : पारिवारिक समस्या, गरजा पूर्ण करणे हे आजचे पहिले काम राहील. योग्य पद्धतीने पूर्ण केलेल्या आर्थिक करारांवर स्वाक्षरी करा. विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल.

सिंह : राग अनावर होईल. इच्छित भेटी घडून येतील. सामाजिक क्षेत्रातील कार्याने प्रसिद्धी मिळेल.

कन्या : घरगुती कामात पत्नीला मदत कराल. विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू मिळतील. उत्तरार्धात मौजमजा करण्याकडे ओढा असेल.

तुळ : वरिष्ठांकडून कामाची तपासणी होण्याची शक्यता. व्यवसायिकांसाठी दिवस नवीन योजना प्रत्यक्षात आणण्याचा. उत्साह व उमेदीने कामे पूर्ण करा.

वृश्चिक : आजोबांच्या सल्ल्याने केलेली आर्थिक गुंतवणूक पुरेसा नफा देईल. तरुणांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाग घ्याल. जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधाल.

धनु : पत्नीचे वागणे आश्चर्यकारक असेल. तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्याला प्राधान्य द्या. सर्वांशी मुद्देसुद बोला.

मकर : संततीच्या माध्यमातून धनलाभाची शक्यता. घरगुती पातळीवर वातावरण गरम असेल. शारीरिक थकवा दूर करण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे.

कुंभ : समविचारी व्यक्तीशी व्यवहार करताना सजग राहा. प्रिय व्यक्तीकडून अपेक्षित होकार मिळेल. उत्तरार्धात मनोरंजनाचे कार्यक्रम पाहाल.

मीन : जोडीदाराबरोबर निसर्गरम्य सहलीचा आनंद लुटा. पैशांसंबंधी समस्या मित्रांमुळे सुटेल. आप्तेष्टांच्या भावना दुखावल्या जातील असे वर्तन टाळा.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment