आजचे राशीभविष्य

 1. मेष:-
  प्रवासात काहीसा त्रास जाणवतो. कामातील तांत्रिक गोष्टी जाणून घ्याव्यात. वैद्यकीय व्यवसायातील लोकांना दिवस चांगला जाईल. उपासनेला बळ मिळेल. स्वकष्टावर अधिक भर द्याल.
 2. वृषभ:-
  वैवाहिक खर्च वाढू शकतो. काही गोष्टी अचानक घडू शकतात. मनातील आकांक्षा पूर्ण कराल. सरकारी कामात अधिक लक्ष घालावे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
 3. मिथुन:-
  कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा लागेल. भागीदाराशी क्षुल्लक कारणावरून मतभेद संभवतात. नवीन लोकांशी सबुरीने वागावे. कोणतीही गोष्ट फार ताणू नका. कलेसाठी अधिक वेळ काढावा.
 4. कर्क:-
  कामाच्या ठिकाणी रूबाब वाढेल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. छुप्या शत्रूंचा त्रास कमी राहील. नातेवाईकांशी सबुरीने वागावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल.
 5. सिंह:-
  मुलांच्या धावपळीकडे लक्ष ठेवावे. शक्यतो पैजेत भाग घेऊ नका. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा माराल.
 6. कन्या:-
  जमिनीच्या कामातून लाभ होईल. घरातील शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. वाहन विषयक कामांना गती येईल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. वैवाहिक सौख्यात भर पडेल.
 7. तूळ:-
  भावंडाचे सहकार्य मोलाचे ठरेल. कामात अधिक ऊर्जा येईल. हातात नवीन अधिकार येतील. स्वबळावर कामे हाती घेता येतील. काहीसा सुस्तपणा जाणवेल.
 8. वृश्चिक:-
  मुलांच्या कालगुणांना वाव द्यावा. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. मित्र-परिवार जमवाल. गप्पा-गोष्टींची आवड पूर्ण कराल. प्रेमाच्या दृष्टीने मैत्री वाढेल.
 9. धनु:-
  घाईने निर्णय घेऊ नका. आपल्यातील ऊर्जेचा सकारात्मक उपयोग करावा. काही बदल जाणीवपूर्वक करावेत. खर्चाकडे लक्ष ठेवावे. कौटुंबिक प्रश्न आधी मार्गी लावावेत.
 10. मकर:-
  प्रवासात काळजी घ्यावी. कौटुंबिक सहलीचे आयोजन कराल. परिस्थिती लक्षात घेऊन वागावे. जुन्या गोष्टी मनातून काढून टाकाव्यात. हस्तकलेला अधिक वेळ द्यावा.
 11. कुंभ:-
  सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. हजरजबाबीपणा दाखवाल. आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. मानसिक स्वास्थ्य जपावे.
 12. मीन:-
  तुमच्यातील कलेचे सर्वदूर कौतुक केले जाईल. प्रेमळपणे गोष्टी साध्य करता येतील. दिवस आपल्या मर्जी प्रमाणे घालवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. सर्वांशी लाघवीपणे बोलाल.
  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment