तिरुअनंतपुरम : कोलम येथील भागिरथी अम्मांना वयाच्या नवव्या वर्षी कौटुंबिक कारणांमुळे शिक्षण सोडून द्यावे लागले होते. अवघ्या तिशीत वैधव्य आल्यानंतर त्यांच्या सहा मुलांच्या पालनपोषणासाठी काम करणे आवश्यक असल्याने त्यांना पुन्हा शिक्षण घेणे शक्य झाले नाही. मात्र, केरळमधील राज्य साक्षरता अभियानाच्या निमित्ताने त्यांच्या मनात पुन्हा शिक्षणाची इच्छा जागी झाली. त्यानुसार त्यांनी चौथीची परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांना गणित, पर्यावरण आणि मल्याळम या विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागल्या. वयोवृद्धत्वामुळे प्रत्येक पेपर सोडविण्यासाठी त्यांना एक पूर्ण दिवस लागला. या परीक्षेत त्यांना २७५ पैकी २०५ मार्क मिळाले असून, गणितात पैकीच्या पैकी मार्क त्यांनी मिळवले आहेत. भगिरथी अम्मांना सहा मुले आहेत. १५ नातवांपैकी तीन नातवंडे आता हयात नाहीत. त्यांना आता १२ नातू व पणतू आहेत.
केरळमध्ये १०५ वर्षांच्या आजींनी चौथीची परीक्षा उत्तम गुणांसह पार केल आहे. केरळमधील साक्षरता अभियानाअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या त्या सर्वांत जास्त वयाच्या व्यक्ती ठरल्या आहेत. कोलम येथून त्यांनी स्टेट लिटरसी मिशन अंतर्गत चौथीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा रिझल्ट बुधवारी जाहीर झाला.
साक्षरता अभियानात सामील झालेल्या त्या सर्वांत वृद्ध व्यक्ती ठरल्या आहेत. साक्षरता अभियानाच्या संचालक पी. एस. श्रीकला यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. आता चौथीत उत्तम मार्क मिळवल्याने खूश झालेल्या भागिरथी अम्मांनी दहावीची परीक्षा देण्याचा मानस व्यक्त केला आहे. साक्षरता अभियानांतर्गत११ हजार ५९३ जणांनी चौथीची परीक्षा दिली. त्यात १० हजार १२ जण उत्तीर्ण झाले. त्यात ९ हजार ४५६ महिलाांचा समावेश आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या साक्षरता परीक्षेत ९६ वर्षांच्या कार्तियानी अम्मा या १०० पैकी ९८ गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या होत्या. 'अक्षरालक्षम' परीक्षा त्यांनी दिली होती. केरळ हे चार वर्षांत संपूर्ण साक्षर राज्य करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात १८.५ लाख निरक्षर आहेत.
About
Gosip4U
Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.
0 comments:
Post a Comment
Please add comment