झुनझुनवाला कुटुंबियांची चौकशी

झुनझुनवाला कुटुंबियांची चौकशी


भांडवली बाजार नियंत्रक सेबीने प्रसिध्द गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या कुटुंबियांची इन्सायडर ट्रेडिंग (Insider Treding) प्रकरणी चौकशी केली आहे. अॅप्टेक कंपनीच्या शेअर खरेदी प्रकरणी सेबीने राकेश झुनझुनवाला यांची चौकशी केली आहे. झुनझुनवाला यांच्यासह पत्नी रेखा , त्यांचा भाऊ राजेशकुमार आणि बहीण तसेच सासू यांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय रमेश दमानी आणि मधु जयकुमार यांचीही चौकशी करण्यात आली आहे.

झुनझुनवाला यांनी २००५ मध्ये अॅप्टेक कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मात्र यात इन्सायडर ट्रेडिंग झाल्याचा संशय सेबीने व्यक्त केला आहे. २००५ मध्ये झुनझुनवाला यांनी अॅप्टेक कंपनीचा शेअर ५६ रुपयांना खरेदी केला होता. टप्याटप्यात त्यांनी कुटुंबियांच्या इतर सदस्यांच्या नावे ४९ टक्के शेअर खरेदी केले. यातून या शेअरचे बाजारमूल्य ६९० कोटी झाले. २३ जानेवारी रोजी झुनझुनवाला यांची बहीण सुधा गुप्ता यांची चौकशी करण्यात आली. रेअर एंटरप्राइसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अॅप्टेक कंपनीचे संचालक उत्पल सेठ यांची बहीण उष्मा सेठ सुळे यांना २८ रोजी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.

झुनझुनवाला यांच्याकडे किती  संपत्ती
राकेश झुनझुनवाला हे भारतातील वॉरेन बफे म्हणून ओळखले जातात. ब्लूमबर्ग संस्थेच्या अंदाजानुसार झुनझुनवाला जवळपास ११ हजार १४० कोटींचे मालक आहेत. यापूर्वीही झुनझुनवाला यांची सेबीने चौकशी केली होती. २०१८ मध्ये जिओमेट्रीक कंपनीतील शेअर खरेदी प्रकरणी झुनझुनवाला यांची सेबीने चौकशी केली. त्यावेळी झुनझुनवाला यांनी २.४८ लाख भरुन हा दावा निकाली काढला.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment