'हा' आहे जगातील सर्वात लहान 'अँड्राईड पीसी'

'हा' आहे जगातील सर्वात लहान 'अँड्राईड पीसी'

चीनची टेक्नोलॉजी कंपनी 'बी 2 गो' ने आतापर्यंतचा सर्वात लहान अँड्राईड पीसी 'एक्स 96 एस' (वायरलेस डाँगल) लाँच केला आहे.


या डिव्हाईसचा आकार च्युईंगम पॅकच्या आकारा एवढा आहे. हे डिव्हाईस एक एंट्री लेव्हल टिव्ही स्टिक आहे. ज्याचा टिव्ही आणि कॉम्प्युटरला कनेक्ट केले जाऊ शकते.

या अँड्राईड पीसीचे वजन 31 ग्रॅम आहे. कंपनीने या डिव्हाईसला 2 व्हेरिएंटमध्ये चीनच्या बाजारात लाँच केले आहे. मात्र हे डिव्हाईस अद्याप बाजारात उपलब्ध नाही.

यामध्ये 2 जीबी + 16 जीबी आणि 4 जीबी + 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटचा समावेश आहे. कंपनीने या व्हेरिएंटची किंमत 6 हजार 600 रुपये व दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 8 हजार 899 रुपये ठेवली आहे.

या गॅजेटमध्ये चांगल्या परफॉर्मेंससाठी माली-जी 31 जीपीयूसह क्वॉडकोर एमोलॉजिक एस 905 वाय 5 सीपीयू दिला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी यात अँड्रॉईड 8.1, ड्युअल बँड वाय-फाय आणि ब्लूटूथ व्हर्जन 4.2 सारखे फीचर्स मिळतील. 3 डी कँम्पेटिबल टिव्हीत 3 डी गेमिंग पाहण्याचा आनंद घेऊ शकतील.






About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment