मास्टर ऑफ टेनिस परफॉर्मन्स प्रोग्रामने पुरस्कृत भारताचा सुरेश मौर्य जगातील दूसरा भारतीय आणि 13 वा आशियाई प्रशिक्षक बनला आहे
सुरेशच्या मुकूटातील नवीनतम पंख म्हणजे आता त्याला व्यावसायिक टेनिस रेजिस्ट्री (पीटीआर) मास्टर ऑफ टेनिस - परफॉरमेंस (एमओटीपी) प्रोग्राम पूर्ण करणारा दुसरा भारतीय म्हणून ओळखला जाणार आहे.
हिल्टन हेड बेट येथे पीटीआरचे एमओटीपी मुख्यालय आहे. आजवर हे केवळ दोन भारतीयांनी पूर्ण केले आहे, ते म्हणजे श्रीमल भट्ट आणि सुरेश मौर्य.
*एमओटीपी म्हणजे नेमके काय?* : एमओटीपी अभ्यासक्रम दोन वर्षांसाठी एकूण 12 टेनिस प्रशिक्षकांना आपल्या छत्रछायेत घेत असतात. याअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या 16,000 प्रशिक्षकांपैकी केवळ 12 प्रशिक्षकांची निवड करण्यात येते. हा कोर्स पूर्ण झाल्यामुळे सुरेश जागतिक स्तरावरील 67 प्रशिक्षकांपैकी एक आणि 13 वा आशियाई प्रशिक्षक बनला आहे.
पीटीआरचा एमओटीपी कार्यक्रम हा एक अत्यंत नामांकित अभ्यासक्रम आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ अॅक्रिडीटेशन ऑफ कोचिंग एज्युकेशन (एनसीएसीई), क्रीडा प्रशिक्षकांसाठी राष्ट्रीय मानक (एनएसएससी) आणि युनायटेड स्टेट्स ऑलिम्पिक समिती (यूएसओसी) द्वारे ते अधिकृत आहेत. आयटीएफच्या टेनिस प्रशिक्षकांच्या सर्वोच्च कामगिरीशीही या कार्यक्रमाचा संबंध आहे. यातील, सर्वांत उच्च पातळीचे स्तर 5 आहे.
सुरेश मागील 15 वर्षांपासून प्रशिक्षक आहेत. जवळपास 8 वर्षे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) च्या लेव्हल 3 चा प्रशिक्षक म्हणूनही युनायटेड स्टेट्स प्रोफेशनल टेनिस रेजिस्ट्री (यूएसपीटीआर) प्रोफेशनल ए सर्टिफिकेट धारक आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment