![]() |
'मिस्टर इंडिया' फीचर WhatsApp आणणार! |
लोकप्रिय मेसेजिंग ऍप व्हॉट्सऍप ने नवीन वर्षात आपल्या युजर्ससाठी काही दमदार फीचर्स आणले आहेत. यामुळे व्हॉट्सऍप वरच्या चॅटींगची गंमत आणखी वाढणार आहे. व्हॉट्सऍप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सऍप ही आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. असंच एक भन्नाट फीचर व्हॉट्सऍप लवकरच आणणार आहे. डिसऍपेरिंग मेसेज असं या नव्या फीचरचं नाव असून यामध्ये मेसेजचा वेळ ठरवता येणार आहे.
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सऍप एका भन्नाट फीचरवर काम करत आहे. यामध्ये पाठवलेला मेसेज किती वेळ दिसेल याची वेळ पाठवणाऱ्याला ठरवता येणार आहे. म्हणजेच एखाद्याने मेसेज केला तर त्या मेसेजचे आयुष्य ठरवता येणार आहे. ही वेळ संपल्यानंतर चॅट आपोआप डिलीट होणार आहे. व्हॉट्सऍप मध्ये लवकरच डिसऍपेरिंग हे फीचर देण्यात येणार आहे. हे सिलेक्ट केल्यावर सर्व चॅट गायब होणार आहे. टेलिग्राम ऍपवर हे फीचर आधीपासूनच उपलब्ध आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment