व्हॉट्सअॅपने कॉल वेटिंग फिचर आणून लाखो मोबाईलधारकांची समस्या सोडविली आहे. या फिचरमुळे कॉल आल्यानंतर युजरला माहिती मिळणार असून करणाऱ्यास बिझी टोन ऐकू येणार आहे.
दरम्यान युजरला 2 सुविधा दिल्या आहेत. यामध्ये युजर कॉलला रद्द करू शकतो किंवा पहिला कॉल बंद करून दुसऱ्या कॉलवर बोलता येणार आहे.
मात्र युजरला पहिला कॉल होल्डवर ठेवता येणार नाही. म्हणजेच याद्वारे युजर ग्रुप कॉलिंग करू शकत नाही. गत महिन्यात हे फिचर आयफोनसाठी आणले होते. आता अँड्रॉईडसाठीही दिले आहे.
अँड्रॉईड युजर व्हॉट्सअॅपमध्ये नवीन अपडेट आले आहेत. बीटा व स्टेबल या दोन्ही व्हर्जनवर हे फिचर काम करणार आहे.
युजर इंटरफेसवर हिरव्या रंगामध्ये 'End & Accept' बटनासोबत लाल रंगामध्ये 'Decline' बटन मिळणार आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment