मुंबईतील सुप्रसिद्ध वाडिया हॉस्पीटल बंद करण्याच्या वादात आता मनसेने उडी घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी काहीही झालं तरी वाडिया हॉस्पीटल बंद होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या वाडिया रुग्णालातील कामगारांच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी मनेसेचे नेते बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते.
"वाडिया हॉस्पीटल बंद झालं तर गोरगरीबांनी उपचारासाठी जायचं कुठे? महापालिका आणि संबंधित मंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन यावर तोडगा काढावा. काहीही झालं तरी हे हॉस्पीटल आम्ही बंद होऊ देणार नाही'', असा इशारा शर्मिला ठाकरे यांनी दिला आहे.
महापालिका अनुदानाची थकबाकी देत नसल्याने हॉस्पीटल बंद करावे लागणार असल्याचा दावा करणारे वाडिया प्रशासन आणि पालिकेने परस्परविरोधी दावे केले आहेत. मागील आठवड्यापासून वाडिया हॉस्पीटलने नव्या रुग्णांना दाखल करून घेण्याची प्रक्रियाही थांबवली आहे. अनुदानाअभावी वैद्यकीय सेवा आणि औषधांसह विविध सेवा देणाऱ्या व्हेन्डर्सना पैसे देता आलेले नाहीत. त्यामुळे रुग्णांसह, हॉस्पीटलच्या कर्मचाऱ्यांवरही 'संक्रांत' आली आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment