व्हाट्सअप मध्ये आलाय VIRUS

whats-app-virus

                                   व्हाट्सअप मध्ये आलाय VIRUS

सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग ऍप WhatsApp सातत्याने नवनवे अपडेट देअसते. फेक न्यूज रोखण्यासाठी व्हॉटसऍप ने फॉरवर्ड मेसेज असेल तर तसं नोटिफिकेशन मेसेजवर दिसतं. व्हॉटसऍप माध्यमातूनही आता सायबर हल्ला केला जात आहे. नव्या वर्षात हॅकर्सनी नवी ट्रिक वापरली आहे. नव्या वर्षानिमित्त सर्वचजण एकमेकांना शुभेच्छा देतात. याचाच फायदा घेत New Year Virus हॅकर्सनी एक्टिव केला आहे. यातून स्मार्टफोनला टार्गेट केलं जात आहे.

युजर्सना एक मेसेज व्हॉटसअॅपवर पाठवला जातो. यामध्ये एक वेबलिंक असते. यामध्ये तुम्हाला काही ऑफर दिल्या जातात. या आकर्षक ऑफरवर युजर क्लिक करताच एक वेबपेज ओपन होतं. त्याच्या माध्यमातून तुमच्या स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरमधील डेटा हॅक केला जाऊ शकतो. अशा खोट्या लिंक तुम्हाला नव्या वर्षाच्या हटके शुभेच्छा देण्याचा बहाण्याने पाठवल्या जात आहेत. तसेच काही ऍप्स डाऊनलोड करण्यासाठीच्या लिंकही फ़ॉरवर्ड केल्या जात आहेत.
व्हाट्सअपवर येणाऱ्या अशा लिंक क्लिक करू नका. काही दिवसांपूर्वी एसबीआयच्या क्रेडिट कार्डची लिंक व्हायरल होत होती. यामुळे खात्यातून रक्कम हॅकर्स काढून घेत होते. काही ऍप्समधून तुमची बँक खात्यांची माहिती, क्रेडिट-डेबिट कार्डच्या डिटेल्स घेतल्या जातात. त्यामुळं तुम्ही असे मेसेज आले असतील तर ते क्लिक न करता डिलिट करा.
फक्त व्हाट्सअपच  नाही तर इतर ऍप्स वर जाहिरातीच्या माध्यमातून काही लिंक्स येतात. त्याशिवाय टेक्स्ट मेसेजही पाठवले जातात. त्यामुळे अशा प्रकराच्या मेसेजवर क्लिक करू नका आणि त्या डिलिट करा.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment