मांजराच्या वाढदिवसाचा TikTok मराठी VIDEO तुफान व्हायरल

फ्रिलचा फ्रॉक घातलेल्या मांजरीला मराठमोळ्या गाण्याच्या पार्श्वभूमीवर चक्क औक्षण केलं जातंय.

मांजराच्या वाढदिवसाचा TikTok मराठी VIDEO तुफान व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एक TikTok व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका गोड गोंडस मांजराचा हा व्हिडीओ आहे. या मांजराच्या मालकीण बाईंकडून त्याचा वाढदिवस साजरा होत आहे आणि त्याचाच हा व्हिडीओ आहे. मराठमोळ्या गाण्याच्या पार्श्वभूमीवर मांजराला चक्क औक्षण केलं जातंय.  अगदी पोटच्या मुलाचा किंवा आपल्या कोणत्याही प्रिय व्यक्तीचा ज्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो अगदी तसाच या मांजराचा वाढदिवस या कुटुंबात मोठ्या उत्साहात साजरा होताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मार्जार प्रेमींना आनंद देत आहे. खरंतर मांजर हा पाळीव प्राणी अनेकांच्या घरी असतो. काहीजण आपल्या मांजरांचं किती कोडकौतुक करतात किंवा आपल्या घरातला पाळीव प्राणी हा कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच किती महत्वाचा आहे हे या व्हिडीओत बघायला मिळतं. 





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment