जिवाशी खेळ चाललाय !!! हे काय आहे ?

 • पाणीपुरी वाले ज्या तापमानाला पुरी तळतात , त्या तापमानाला तेल फाटलेले असते , ते Ransid झालेले असते , जे अत्यंत अपायकारक आहे , ते कोण चेक करणार ?
 •  गोड पाणी म्हणून नुसतं कॉर्न फ्लोअर शिजवून लाल कलर टाकून खाऊ घालतात , खजूर चटणी म्हणून ते कोण बघणार ?
 •  बेंगलोर बेकरी वाले डालडा आणि पिठी साखर कालवून त्याची क्रीम बनवून केकवर लावतात ते बरं चालतं त्यातले कलर बरे चालतात.
 • पावाला कलर यावा म्हणून वरच्या बाजूला रासबेरी रेड कलर लावून भाजतात बरंय का ते ?
 • गुजरात मधून शेंगदाणा येताना लाल खडे टाकून आणि भिजवूनच येतात , बसतं का हे नियमात 
 • चायनीजचे गाडे तर भेसळीचे अड्डे बनलेत दिसतं तसं काहीच नसतं कधी करणार त्यावर अॅक्शन ?
 • दरवेळी वॉटर प्लान्ट मध्यल्या पाण्याचा Ph चेक होतो का ? कोण बघणार ?
 • स्वीट मार्ट वाले फाफडा करताना धुण्याचा सोडा वापरतात , त्यांना सोडायचं का मोकळं.
 • हरियाणा वाले इन्स्टंट जिलेबी बनवतात हायड्रो पावडर टाकून लागते का ती गोड ?
 • राजस्थानी,,, बदाम शेक करताना , त्यात दुधाऐवजी माल्टो ड्रेक्स्ट्रीन टाकतात कोण बघणारय ?
 • इडली दोस्या वाले आण्णा लोकं तुमच्या नाकावर टिच्चून रेशनचा तांदूळ आणतात , गोड लागते का तेंव्हा इडली ?
 • आता उन्हाळ्यात लस्सी , शरबतावाले दुकाने थाटतील ! गोडव्यासाठी सोडायम सॅकरीन वापरतील त्यांच्याकडे बघू नका ! शप्पथ आहे तुम्हाला ! 
 • बिहारी भैये ऑक्सीटोसीन  इंजेक्शन देऊन म्हशीचं दुध काढून विकतील ते पिऊ दया लोकांना  आयुष्य वाढतंय त्याने .
 • सॉफ्ट ड्रींक तयार करणाऱ्या गल्ली बोळातल्या कंपन्या किती Co2 मिसळताहेत पाण्यात  बिल्कूल बघू नका .
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment