युक्रेनच्या विमानाला अपघात; विमानात १८० प्रवासी

yukren-plaincrash
                             युक्रेनच्या विमानाला अपघात; विमानात १८० प्रवासी

तेहरान: इराणची राजधानी तेहरानमध्ये युक्रेनचे विमान कोसळले आहे. तेहरान विमानतळाजवळ कोसळलेल्या विमानात १८० प्रवासी असल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे.

युक्रेन एअरलाइन्सचे बोईंग ७३७ या विमानाने तेहरान विमानतळावरून उड्डाण घेतले. अवघ्या काही वेळेतच विमान कोसळले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे. अपघातग्रस्त विमान हे युक्रेनची राजधानी कीव येथे जात होते. विमानात १८० प्रवासी आणि क्रू होता. बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment