ट्रम्प म्हणाले 'ऑल इज वेल'!
वॉशिंग्टन: इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाईतळावर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणावात आणखीच भर पडली आहे. या हल्ल्यानंतर 'ऑल इज वेल' या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे संकेत दिले आहेत. या हल्ल्यावर मी उद्या सकाळी निवेदन जारी करणार आहे, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, इराणच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आखाती देशांतील आपली विमानसेवा तूर्त थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यावर प्रत्युत्तर दिलं. 'ऑल इज वेल. इराणने अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. आतापर्यंत तरी सगळं काही ठिक आहे. आम्हीच सर्वात बलशाली आहोत, हे मला पुन्हा एकदा नमूद करायचे आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशी सर्वात सक्षम फौज आमच्याकडे आहे. या हल्ल्यावर आता उद्या सकाळीच मी माझे निवेदन जारी करणार आहे' असे ट्विट करत ट्रम्प यांनी इराणवर मोठा हल्ला करण्याचे संकेतच दिले आहेत.
इराणच्या हल्ल्यानंतर व्हाइट हाऊसने एक निवेदन जारी करत हल्ल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांना तपशीलवार माहिती देण्यात आल्याचे स्पष्ट केले. संपूर्ण स्थितीवर आमची बारीक नजर आहे. राष्ट्रीय सुरक्षा पथकाशीही सल्लामसलत केली जात आहे, असे व्हाइट हाऊसचे माध्यम सचिव स्टीफन ग्रीशम यांनी नमूद केले. दुसरीकडे इराणने आम्ही स्वसंरक्षणासाठी हा हल्ला केल्याचे सांगितले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री जावीद शराफ यांनी निवेदन जारी केले असून आम्ही केलेला हल्ला संयुक्त राष्ट्रांच्या नियमांना धरूनच असल्याचा दावा केला आहे.

0 comments:
Post a Comment
Please add comment