अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या वकिलाविरोधात पोलिसांनी छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे.

 अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या वकिलाविरोधात पोलिसांनी छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत ३ जानेवारी रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. अपमानजनक भाषेचा वापर करत छेडछाड केल्याची तक्रार एका महिलेने वांद्रे पोलिसात केली होती. विशेष म्हणजे नितीन सातपुते हे नाना पाटेकर यांच्याविरोधात तनुश्री दत्ताचे वकील आहेत.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘ही राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाबाहेरील घटना आहे. सातपुते यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप एका ४७ वर्षीय महिलेने केला. पीडितेने यानंतर खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार, मुलांसाठी बाग निर्माण करण्यावरुन सातपुतेंसोबत पीडितेचा २ नोव्हेंबरला वाद झाला होता. यानतंर सातपुतेंनी फोन करुन चुकीची भाषा वापरली. पीडितेने ४ नोव्हेंबर रोजी राज्य महिला आयोगात याबाबत तक्रार केली.’

या तक्रारीनंतर पीडितेला राज्य महिला आयोगाने बैठकीसाठी बोलावलं होतं. कार्यालयातून बाहेर पडताना सातपुते यांनी जवळ येऊन अपमानजनक भाषेचा वापर केला, असा या महिलेचा आरोप आहे. पोलिसांनी गुरुवारी ३५४ A आणि भा.दं.वि. च्या इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment