दुबईमध्ये असणारी बुर्ज खलिफा ही इमारत सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाते. या इमारतीची उंची 828 मीटर इतकी आहे. मात्र आता पुढच्या वर्षात जगातील सर्वात उंच इमारत बांधली जाणार आहे.
ही इमारत बुर्ज खलिफापेक्षाही 600 फूट उंच असणार आहे. त्याची उंची 1 हजार मीटरपेक्षा अधिक असणार आहे. या इमारतीला जेद्दा टॉवर किंवा किंगडम टॉवर असे नाव दिले आहे.
सौदी अरेबियातील रियाध येथे ही इमारत बांधली जात आहे. इमारतीची उंची ही बुर्ज खलिफाहुन 180 मीटरपासून 591 फुट उंच असणार आहे. ही इमारत बाधंण्यासाठी 8 हजार 797 कोटी रुपये लागणार आहे.
▪ जेद्दा इकोनॉमिक कंपनीचे अध्यक्ष सौदी प्रिन्स अलवलीद बिन तलाल ते या इमारतीचे मालक आहेत.
▪ जेद्दा टॉवरची डिजाइन प्रसिद्ध वास्तुकार एड्रियन स्मिथ व गॉर्डन गिल यांनी तयार केले आहे.
▪ या इमारतीत 55 सिंगल डेक लिफ्ट असणार आहेत, तर 4 डबल डेक लिफ्ट असणार आहे.
या इमारतीत 200 हून अधिक मजले असणार आहे. एका मजल्याचे क्षेत्रफळ 2.43 लाख चौरस मीटर, तर 2 हजार 192 फूट उंच असणार आहे. आतापर्यंत 47 मजले तयार झाले असून आहेत.
0 comments:
Post a Comment
Please add comment