सुरत लुट........छत्रपती शिवाजी महाराजांची

सुरत लुट – महाराजांनी लुटलेल्या खजिन्याचा अर्धा हिस्सा आजही सापडलेला नाही…


छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोड युद्धकौशल्याची साक्ष इतिहासात अनेक ठिकाणी अभ्यासायला मिळते. त्यांची राजकारणाची पद्धत, गनिमी कावा तंत्र हा जगभरातल्या इतिहास अभ्यासकांच्या कुतूहलाचा विषय आहे.छत्रपतींनी अनेक लढाया जिंकल्या, प्रसंगी तह सुद्धा केले. पण हे करत असताना त्यांनी प्रजेची काळजी मात्र आवर्जून घेतली.
त्यांचे समकालीन शासनकर्ते एखाद्या ठिकाणी हल्ला करत असतील तर तिथल्या नागरिकांची सरेआम कत्तल करत असत.मात्र आपले छत्रपती शिवाजी महाराज निष्पाप प्रजेच्या केसालाही धक्का लावत नसत. हेच त्यांचे मोठेपण होते.


महाराजांनी सुरत लुटले हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण त्यांनी दुसऱ्यांदा सुरत लुटले हे फार कमी जण जाणतात.  ३ ऑक्टोबरला महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत शहर लुटून मुघल साम्राज्याला जबरदस्त धक्का दिला होता.
  !!तर जाणून घेऊया ही अद्भुत कहाणी…!!
सुरत शहर! मुघलांचे महत्वाचे व्यापारी शहर! या शहरात सोने-नाणे, हिरे-माणके खच्चून भरलेले होते. पहिल्या लुटीच्या वेळी या सुरत शहराला मराठा सैन्याने साफ केले होते आणि स्वराज्याचा खजिना भरला होता.
स्वराज्याच्या उभारणीसाठी त्या लुटीची मोलाची मदत झाली. पण अर्थातच यामुळे औरंगजेब खवळला होता. त्याने मिर्जा जयसिंहाला मराठ्यांवर हल्ला करण्यासाठी पाठवले. जयसिंहाने आपल्या प्रचंड सेनेच्या जोरावर असा पेच टाकला होता की, महाराजांना त्याच्याशी तह करणे भाग पडले होते.
 हाच तो सुप्रसिद्ध पुरंदरचा तह! या तहात महाराजांना आपले २३ किल्ले आणि चार लक्ष रुपयांवर पाणी सोडावे लागले. नंतर आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला जावे लागले आणि तिथे अपमान झाल्यावर नजरकैदेत राहावे लागले.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment