नोटांवर लक्ष्मीदेवीचा फोटो छापा, रूपया मजबूत होईल : सुब्रमण्यम स्वामी

नोटांवर लक्ष्मीदेवीचा फोटो छापा, रूपया मजबूत होईल 

सुब्रमण्यम स्वामी यांचे मंगळवारी रात्री मध्यप्रदेशच्या खंडवामध्ये भाषण झाले. ‘स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला’विषयावर भाषण झाल्यानंतर पत्रकारांशी बातचीत करताना पत्रकारांनी इंडोनेशियाच्या चलनावर भगवान गणेशाचे छायाचित्र असल्याकडे स्वामींचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना, “या प्रश्‍नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच देऊ शकतात. माझे यासाठी समर्थन आहे. भगवान गणेश विघ्नहर्ता आहेत. मी तर असे म्हणेन की भारतीय चलनाची स्थिती सुधारण्यासाठी आपल्या नोटांवर देवी लक्ष्मीचे छायाचित्र छापले जावे. कोणालाही याबद्दल वाईट वाटू नये”, असे स्वामी म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचे नेता आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या होणाऱ्या घसरणीबाबत एक अजब विधान केलं आहे. ‘भारतीय चलनाची स्थिती सुधारण्यासाठी नोटांवर देवी लक्ष्मीचे छायाचित्र छापण्याच्या बाजूने आपण आहोत’, असे स्वामी म्हणालेत.
“नागरिकत्व दुरूस्ती कायद्यात (सीएए) काहीच आक्षेपार्ह नाही. कॉंग्रेस आणि महात्मा गांधींनीही सीएएचे समर्थन केले होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही 2003 मध्ये सीएए आणण्याची विनंती केली होती”, असंही स्वामी पुढे म्हणाले. त्यापुढे बोलताना,” भारतातील वाढती लोकसंख्या चिंतेचा विषय नसून, लोकसंख्येचा उत्पादकता म्हणून वापर करण्यासाठी लोकांना शिक्षित करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. हिंदू आणि मुस्लीम यांचा डीएनए एकच आहे, दोघांचे वंशजही एकच आहेत”, असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment