केंद्राच्या 'डिजिटल इंडिया कॅशलेस इंडिया'अंतर्गत सुरू झालेल्या एसटीच्या कॅशलेस प्रवासासाठी जनतेला तूर्तास वाट पहावी लागणार आहे. सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळण्यासाठी महामंडळाने सुविधा कार्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र सध्या त्याची अंमलबजावणी रखडली आहे. 'युती' सरकारच्या काळातील कॅशलेस योजना 'महाविकास आघाडी' सरकारच्या काळात राबवण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. भरीस भर म्हणजे, महामंडळाला अध्यक्ष नसल्याने याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही. अध्यक्षपदाचा तिढा कायम असल्याने सामान्यांचे कॅशलेस प्रवासाचे स्वप्न भंगल्याचे वास्तव आहे.
कॅशलेस कार्ड योजना सुरू करण्याबाबत सुरुवातीपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये गटबाजी होती. एसटीचा प्रवासी ग्रामीण भागात जास्त असल्याने त्याला कार्ड प्रवास जमणार नसल्याचे मत वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांचे होते. तर कार्डवर सवलत, कॅशबॅक अशा ऑफर दिल्यावर प्रवासी या कार्डकडे आकर्षित होतील, शिवाय या योजनेमुळे 'डिजिटल इंडिया' योजनेला ही प्रोत्साहन मिळेल, असे मत दुसऱ्या गटातील अधिकाऱ्यांचे होते.
तत्कालीन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी महामंडळाच्या वर्धापन दिनी हे कार्ड सुरू करण्याचे घोषित केले. कार्डची काही एसटी स्थानकांमध्ये नाममात्र चाचणी झाली. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून महामंडळाला अध्यक्ष नसल्याने केंद्राच्या धर्तीवर सुरू झालेली सुविधा कार्ड योजना अडगळीत पडली आहे. सुविधा कार्डच्या अंमलबजावणीबाबत महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अधिकृतपणे बोलण्यास नकार देत जनसंपर्क विभागातून माहिती घ्या, असा सावध पवित्रा घेतला.

0 comments:
Post a Comment
Please add comment